मुंबई : ‘बिग बॉस १६’ मध्ये ‘ओके ब्रो…’ म्हणत सर्वांचं मनोरंजन करणारा अब्दू रोझिक कायम चर्चेत असतो. सध्या तो बिग बॉसमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. अनेकदा बिग बॉसच्या घरात देखील अब्दू सर्वांसोबत आनंदी राहताना दिसतो. शोमध्ये अभिनेता शिव ठाकरे अब्दूचं कौतुक करत म्हणाला, ‘अब्दू देवाचा दूत आहे…’ एवढंच नाही, तर रॅपर एमसी स्टँनने देखील ‘अब्दूवर देवाची कृपा असल्याचं म्हटलं आहे. अब्दू कायम त्याच्या खास अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो.
आज जगातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व असलेला अब्दू एकेकाळी रस्त्यावर गाणं गायचा… हे सत्य अब्दूच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे. अब्दू आज गायक, म्यूझिशियन आणि बॉक्सर आहे. अब्दू जगातील सर्वात लहान गायक आहे. पण एक वेळ अशी होती, जेव्हा अब्दूची ओळख काहीच नव्हती. पण आज अब्दूला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
अब्दूचा जन्म २००३ मध्ये तझाकिस्तानमध्ये झाला होता. तो आता फक्त १९ वर्षांचा आहे. एका गंभीर आजारामुळे अब्दूची उंची वाढू शकली नाही. तेव्हा एका प्रसिद्ध रॅपर आणि ब्लॉगर Baron ची नजर अब्दूवर पडली आणि रॅपरने अब्दूला गायन क्षेत्रात करियर करण्यासाठी मान्य केलं.
रॅपरच्या एका शब्दावर अब्दू मान्य झाला आणि Baron सोबत करियरच्या पुढच्या प्रवासासाठी दुबई याठिकाणी गेला. Baron ने अब्दू आर्थिक मदत देखील केली. आज अब्दूला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज त्याच्या पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे. बिग बॉसच्या प्रवेश केल्यानंतर त्याने सर्वांच्या मनात घर केलं.
अब्दूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रावर अब्दूला जवळपास ६.८ मिलियन युजर्स फॉलो करतात. एवढंच नाही, तर अनेक सेलिब्रिटी देखील अब्दूचं कौतुक करतात.
एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा देखील केला. एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. अब्दू एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण ती मुलगी अब्दूला सोडून गेली.