Abhidnya Bhave: “माझा देवावरून विश्वासच उडाला..”; अभिज्ञा भावे असं का म्हणाली?
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेहुलला कॅन्सरचं (Cancer) निदान झालं आणि अभिज्ञाच्या पायाखालची जमीनच सरकली. बऱ्याच महिन्यांच्या उपचारानंतर मेहुल आता कॅन्सरमुक्त झाला आहे. मात्र तो संपूर्ण प्रवास अत्यंत कठीण असल्याचं अभिज्ञाने सांगितलं.
अभिनेत्री अभिज्ञा भावेनं (Abhidnya Bhave) 2021 मध्ये प्रियकर मेहुल पैशी (Mehul Pai) लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेहुलला कॅन्सरचं (Cancer) निदान झालं आणि अभिज्ञाच्या पायाखालची जमीनच सरकली. बऱ्याच महिन्यांच्या उपचारानंतर मेहुल आता कॅन्सरमुक्त झाला आहे. मात्र तो संपूर्ण प्रवास अत्यंत कठीण असल्याचं अभिज्ञाने सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या अनुभवाविषयी सांगितलं.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञा म्हणाली, “तो एक असा काळ होता जेव्हा तुम्हाला जीवनाचं खरं महत्त्व कळतं. आपण अशा जगात राहतो जिथे भौतिक गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. परंतु मला वाटतं की आपल्याला खरोखर जीवनात काय हवं आहे आणि त्याचा काय अर्थ आहे हे आपल्याला माहीत असतं. त्या भौतिक गोष्टी तुम्हाला आनंद देत नाहीत. तिथूनच अंतर्मनाचा प्रवास सुरू होतो. आम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि आम्ही आयुष्यात काय करत आहोत हे विचार करण्यासाठी वेळ मिळाला.”
View this post on Instagram
कॅन्सरला सामोरं जातानाचा अनुभव सांगताना तिने पुढे सांगितलं, “ते भयंकर होतं. कारण आपण अशा गोष्टींचा स्वप्नतादेखील विचार करत नाही. शारीरिकदृष्ट्या कॅन्सरला सामोरं जाणं खूप भयानक होतं. मी ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ते खूप भीतीदायक होतं. त्या एका गोष्टीमुळे मी इतकं बिथरले की माझ्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी किती आभारी राहिलं पाहिजे हेच जणू मी विसरले होते. त्या अनुभवातून आमची विचारसरणी, आमची सकारात्मकता, आमचा विश्वास याची परीक्षाच होती. माझा देवावर असलेला विश्वासही उडाला होता.”
कॅन्सरच्या त्या अनुभवानंतर आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं, असं अभिज्ञाने स्पष्ट केलं. “आपण अत्यंत नाजूक जगात वावरतो. मला वाटतं की आपण आपल्या आजूबाजूला जे नातेसंबंध पाहतो ते खरंच सामाजिकदृष्ट्या किंवा कदाचित भौतिकदृष्ट्या प्रभावित आहेत. त्या अनुभवातून सावरल्यानंतर आता आम्ही एकमेकांच्या आणखी प्रेमात पडत आहोत. त्या सर्व गोष्टींचा आता माझ्यावर अजिबात परिणाम होत नाही”, असं ती म्हणाली.