‘किंग खानला वाटलं तर…’ गायक अभिजीत भट्टाचार्यची शाहरुख खानवर टीका

गायक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खान आणि एआर रेहमानवर टीका केली आहे. किंग खान आणि अभिजीत भट्टाचार्यचा 2004 मधील वाद माहिती असेलच. त्यावर आता अभिजीत भट्टाचार्यने भाष्य केलं आहे. तर यावेळी एआर रेहमानवर यांच्यावरही टीका केली आहे.

‘किंग खानला वाटलं तर…’ गायक अभिजीत भट्टाचार्यची शाहरुख खानवर टीका
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 5:00 PM

बॉलिवूडमधील एका जुन्या वादाला आता पुन्हा तोंड फुटलं आहे. गायक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानवर टीका केली आहे. अर्थातच तुम्हाला किंग खान आणि अभिजीत भट्टाचार्यचा 2004 मधील वाद माहिती असेलच. पण, आता गायक अभिजीत भट्टाचार्यने खुलासा केला आहे की, त्याला शाहरुख खानसोबत सामंजस्य का साधायचे नाही. शाहरुख स्वत:ची गाणी तयार करून गाऊ शकतो, असं म्हणत अभिजीतने किंग खानला टोला लगावला आहे.

अभिजीत भट्टाचार्य किंग खानवर नेमकं काय म्हणाला?

एका मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानवर बोलताना म्हटलं आहे की, ‘संगीत निर्मिती करता आली तर ते स्वत: करतील, त्यात काय आहे. शाहरुख एखादं गाणं असेल तर तेही गातील, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही वाद घालत नाही. पण अशा प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा आग्रह धरणाऱ्या या क्षुल्लक ट्रोलर्समुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. शाहरुखसाठी गाऊन मिळालेले यश कसे हाताळले, या प्रश्नावर अभिजीत म्हणाला की, ‘त्याने आपला राग गमावला.’

शाहरुखसोबतच्या मतभेदावर अभिजीत काय म्हणाला?

शाहरुखसोबतच्या मतभेदावर अभिजीत म्हणाला की, ‘हे मतभेद समोर येणे गरजेचे होते. असे नसते तर ‘लुंगी डान्स’ कसा अस्तित्वात आला असता? शाहरुख स्वतःची गाणी संगीतबद्ध करू शकतो आणि गाऊ शकतो, तरीही लोक माझ्या गाण्यांना शाहरुख खानची गाणी म्हणतात.’

अभिजीत भट्टाचार्यची एआर रेहमानवरही टीका

याच मुलाखतीत अभिजीतने एआर रेहमानसोबतच्या कामाचा अनुभवही सांगितला. त्याने सांगितले की, जेव्हा तो रहमानला भेटायला गेला तेव्हा त्याला हॉटेलमध्ये बराच वेळ थांबावे लागले. “मी ठरवलं की मी जास्त वेळ थांबू शकत नाही, म्हणून मी सकाळी रेकॉर्डिंग करण्याचा सल्ला दिला. पण त्यानंतर रात्री दोन वाजता मला फोन आला की स्टुडिओत यायला सांगा. मी वेडा आहे का? मी त्यांने सांगितले की, मी झोपलो आहे.’’

‘’दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्टुडिओत गेलो तेव्हा तो तिथे नव्हता. आता क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली तुम्ही पहाटे 3.33 वाजता रेकॉर्डिंग कराल असं म्हणत असाल तर मला ते समजत नाही,’ असं म्हणत अभिजीतने टीका केली आहे.

शाहरुख-अभिजीतमधील वाद नेमका काय?

तुम्हाला माहिती आहे का की, 2004 मध्ये शाहरुख खानवर बनवलेल्या मैं हूं ना या चित्रपटातील तुम्हे जो मैने देखा हे गाणे अभिजीतने गायले होते. त्याने सांगितले होते की, त्या चित्रपटात स्पॉटबॉय, केशभूषाकार आणि असिस्टंट ड्रेस निर्मात्यांना श्रेय देण्यात आले होते, गायकाच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.