सलमान हिशोबात नायतर पेनाने कोथळा काढू, बिचुकले पुन्हा भडकले, तर मुख्यमंत्र्यांना काय सल्ला दिला?

सलमान खान बिचुकलेंच्या टार्गेटवर आहे. आता तर बिचुकलेंनी सलमानला कोथळा काढू असाच इशारा देऊन टाकलाय.

सलमान हिशोबात नायतर पेनाने कोथळा काढू, बिचुकले पुन्हा भडकले, तर मुख्यमंत्र्यांना काय सल्ला दिला?
सलमान खानला अभिजीत बिचुकले यांचा इशारा
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 7:33 PM

पुणे : अभिजीत बिचुकले (Ahijeet Bichukle) हे नाव बिग बॉसमुळे (Big boss) साऱ्या देशाला माहिती झालं आहे. पण जसे बिचुकले बिगबॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत तेव्हापासून ते सलमान खानवर (Salman Khan) आग ओकत आहेत. सध्या सलमान खान बिचुकलेंच्या टार्गेटवर आहे. आता तर बिचुकलेंनी सलमानला कोथळा काढू असाच इशारा देऊन टाकलाय. बिग बॉस शोमध्ये सलमान खानची जीभ घसरली होती, ते जे वक्तव्य आहे ते आम्ही दाखवणार नसल्याचं आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं, मात्र मी शोमधून बाहेर पडल्यानंतर ते वक्तव्य पाहिलं आणि माझी तिखट प्रतिक्रिया दिली ती सलमान ने लक्षात घ्यावी. असा सज्जड दमही बिचुकलेंनी सलमानला भरला आहे. सलमान खानला टक्कर देण्या एवढा तो ग्रेट नाही, बॉलीवूड सलमान खानच्या बापाची आहे का? बॉलिवूड मध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. असेही बिचुकले म्हणाले आहेत.

हिशोबात नायतर कोथळा काढू

सलमान खान हा बॉलिवूड मध्ये खूप उतमात करत आहे, सलमानला खान नावाचे त्याला घमेंड असले, तर तो अफजल खान आहे तर मग मी सातारा गादिचा छत्रपती शिवरायांचा वैचारिक वारस आहे. शाहू, फुले,आंबेडकर यांना मानणारा मी आहे, त्यामुळे पेनाने कोथळा बाहेर काढू, असा इशारा बिचुकलेंनी दिला आहे. बिग बॉस मध्ये जेव्हा मला बोलावलं तेव्हा सलमान खान मला म्हणाला होता. आमचा शो चालत नाही त्याला रॉकेट सारखा चांगला स्पीड द्या आणि ते माझ्यामुळे मिळालं आणि सलमानचा मस्तरी स्वभाव जागृत झाला, मात्र मी एवढा या शोमध्ये फेमस झालो त्यामुळे सलमान खान बडबडला. सलमान खानचे दोन तीन चित्रपट सपशेल पडले आणि मी चाललो त्यामुळे सलमान खानची जीभ घसरली. त्याला वाटलं तो बाकी लोकांशी बोलत आहे, जे त्याच्या पुढं हुजरेगिरी करत आहेत, अशी आगपाखड बिचुकलेंनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिला हा सल्ला

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने वाईन दुकानात मिळणार असल्याचे जाहीर केल्यावर त्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना, आता अभिजीत बिचुकलेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच सल्ला दिला आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करायचं चालू आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचा पुनर्विचार करावा आघाडी मध्ये तुम्ही त्या पक्षासोबत गेला असला तरी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना आणखी अंगीकारले पाहिजे. वाईन सुद्धा दारू झाली ह्या विक्रीचा निर्णय मागे घ्या, असे म्हणत, दुकानात काय ठेवायचं असेल अभिजीत बिचुकले आणि सन्स कंदी पेठे ठेवा असा सल्ला बिचुकलेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Bigg Boss 15 Grand Finale LIVE: बिग बॉस 15 चा ग्रॅण्ड फिनाले थोड्याच वेळात सुरू होणार, कोण होणार बिग बॉस 15 चा विजेता?

आराध्या बच्चनचा व्हिडिओ का होत आहे व्हायरल, का म्हणत आहेत तिला कार्बन कॉफी

बिग बॉसचे आजवरचे विजेते कोण आहेत? वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.