बिग बॉसबद्दलचा अभिजीत बिचुकलेचा दावा खोटा ठरला, सलमान गांजा ओढतो म्हणत बिचुकले म्हणाला होता की…

मुंबई : अभिजित बिचकुले (Abhijit Bhichukale) सगळ्याच विषयांवर परखड मतं मांडताना दिसतो. तो काही दिवसांआधीही बिग बॉसच्या (Big Boss) घराबाबत उघडपणे बोलला होता. सलमान खानवरही (Salman Khan) अनेक गंभीर आरोप त्याने केले होते. ‘बिग बॉसच्या घरात जर कुणी चुकत असेल तर त्या माणसाला समजावून सांगणं सलमान खानचं काम आहे. पण त्याऐवजी तू काय गांजा ओढून […]

बिग बॉसबद्दलचा अभिजीत बिचुकलेचा दावा खोटा ठरला, सलमान गांजा ओढतो म्हणत बिचुकले म्हणाला होता की...
सलमान खान, अभिजीत बिचुकले
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 12:20 PM

मुंबई : अभिजित बिचकुले (Abhijit Bhichukale) सगळ्याच विषयांवर परखड मतं मांडताना दिसतो. तो काही दिवसांआधीही बिग बॉसच्या (Big Boss) घराबाबत उघडपणे बोलला होता. सलमान खानवरही (Salman Khan) अनेक गंभीर आरोप त्याने केले होते. ‘बिग बॉसच्या घरात जर कुणी चुकत असेल तर त्या माणसाला समजावून सांगणं सलमान खानचं काम आहे. पण त्याऐवजी तू काय गांजा ओढून बोलत होतास का? तुम्ही माझ्याशी तुलना करू शकत नाही.’, असं बिचुकले म्हणाला. सोबत शमिता शेट्टी (Shamita Shetty) बिग बॉसचा 15 वा सिझन (Big Boss 15) जिंकेल असा त्याने दावा केला होता. तो खोटा ठरला आहे. तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash) बिग बॉसची ट्रॉफी (Big Boss 15 Trophy) जिंकली आहे.

शमिता जिंकणार असल्याचा दावा खोटा

अभिजीत बिचुकलेने दोन दिवसांआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले होते. यात त्याने एका विकेंडच्या डावाचं उदाहण दिलं होतं. ‘राखी सावंतने शमिता शेट्टी या शोची विनर होईल. याचा अर्थ शमिता मॅनेज विनर आहे. जर असं असेल तर तुम्ही आम्हाला इथे का बोलवलं ?’, असा सवाल बिचुकलेने विचारला. ‘शमिताला जिंकवण्यासाठी हे सगळे डावपेच केले गेले. काही गोष्टी लपवल्या गेल्या’, असाही दावा बिचुकेलने केला होता. पण सध्या त्याचा दावा फोल ठरलाय. काल बिग बॉसचा ग्रॅण्ड फिनाले झाला. यात तेजस्वी प्रकाश बिग बॉसची विजेती ठरली. त्यामुळे बिचुकलेने केलेला दावा खोटा ठरला आहे.

‘बिग बॉसच्या घरात जाणं तिथं राहणं त्या शोमध्ये खेळणं आनंदाची गोष्ट असते. पण तिथं जर सगळं मॅनेज झालेलं असेल. तर मग खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला वापरता. सलमानही त्या शोसाठी नोकरी करतो. त्यालाही पर एपिसोड पैसे मिळतात आणि त्याला आता त्या पैश्यांचा माज आला आहे. त्यामुळे त्याने आजूबाजूला काही माणसं उभी केली आहेत. त्यांच्या माध्यमातून तो बोलतोय. इथून पुढे तू बोल त्याला मी उत्तर देतो,’ असं गर्भित इशाराही त्याने सलमानला दिला आहे.

अभिजीत बिचुकले बिग बॉस 15 मध्ये होता मात्र काही दिवसांआधी तो घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने बिग बॉसवर आणि सलमान खानवर अनेक आरोप केले. त्यातच त्याने शमिता शेट्टी जिंकणार असल्याचा आरोप केला होता तो आता खोटा ठरला आहे.

संबंधित बातम्या

Big Boss 15 Winner tejaswi Prakash : तेजस्वी प्रकाशने जिंकली बिग बॉस 15 ची चमचमती ट्रॉफी, विजयी क्षणाचे फोटो

COLORS TV | बिग बॉसची विनर फिक्स्ड? का ट्विटरवर ट्रेंड होतोय TATTI CHANNEL COLORS TV? वादाला तोंड का फुटलंय?

Tejaswi Prakash : बॉयफ्रेंड हरला, गर्लफ्रेंड जिंकली, तेजस्वी प्रकाशच्या हाती चमचमती ट्रॉफी अन् 40 लाख रुपये!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.