बच्चन कुटुंबात वाद? ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांनी जया आणि अमिताभ बच्चन यांना..
ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा 51 वाढदिवस 3 जून रोजी झाला. दरवेळी अमिताभ बच्चन हे लग्नाच्या वाढदिवसाला खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, यंदा त्यांनी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. हेच नाही तर नेहमी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी पार्टी ठेवली जाते. मात्र, यावेळी अशाप्रकारची कोणती पार्टी झाली नसल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शुभेच्छा देखील दिल्या.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस असतानाही अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर केली नाही. दरवेळी अभिषेक बच्चन सोशल मीडियावर पोस्ट करत आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मात्र, यावेळी अभिषेक बच्चन याने पोस्ट शेअर केली नसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
दुसरीकडे ऐश्वर्या राय ही अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला पोस्ट शेअर करून त्यांना शुभेच्छा देते. 2018 मध्ये ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा सुंदर फोटो शेअर करत जया आणि अमिताभ बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तिने पोस्ट शेअर केली नाही. सोशल मीडियावर ऐश्वर्या राय ही अभिषेकला सोडून बच्चन कुटुंबियांपैकी कोणालाही फॉलो करत नाही.
ऐश्वर्या राय तिच्या कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. फक्त बच्चन कुटुंबियांपैकी कोणाचे फोटो ऐश्वर्या राय शेअर करत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबियांमध्ये वाद सुरू असल्याचेही सांगितले जाते. हेच नाही तर जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय.
गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर देखील सोडले आहे. बच्चन कुटुंबात खरोखरच काही वाद सुरू आहे का? असा प्रश्न आता चाहत्यांकडूनही उपस्थित केला जातोय.