ऐश्वर्या-अभिषेकने लेक आराध्यासाठी दुबईत खरेदी केला हा कोट्यावधींचा आलिशान व्हिला; फोटो पाहिलेत का?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा 18 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटत साजरा केला. या जोडप्याने लेक आराध्यासोबत दुबईमध्ये हे सेलिब्रेशन केलं आहे. पण तुम्हाला माहितीये का की अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी लेकीसाठी दुबईत कोट्यावधींचा आलिशान व्हिला खरेदी केला आहे.

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकताच या जोडीने त्यांचा लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा केला. शक्यतो अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय किंवा बच्चन कुटुंब कोणतेही समारंभ असतील किंवा सण असतील तर ते मुंबईतील घरीच साजरा करताना दिसतात.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचे मुलीसोबत सेलिब्रेशन
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायने त्यांचा हा खास दिवस, हे खास क्षण मुलगी आराध्यासोबत दुबईत साजरे केले आहेत.ऐश्वर्याने या खास प्रसंगाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. त्यांची मुलगी आराध्या बच्चन देखील एक लोकप्रिय स्टार किड आहे. ती देखील अनेकदा चर्चेत असते. त्यांनी दुबईत जिथे सेलिब्रेशन केलं आहे ते त्यांचं दुबईतील हॉलिडे होम आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याने खरेदी केला आहे लेकीसाठी आलिशान व्हिला
कधीकधी तो सुट्टीसाठी मुंबईबाहेर जातात. पण यंदा लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेले होते. पण तुम्हाला माहिती आहे की दुबईला अभिषेक-ऐश्वर्याची कोटींचा आलिशान बंगला व्हिला आहे. एका रिपोर्टनुसार दुबईत या जोडप्याने 2015 मध्ये खरेदी केला होता आणि तो जुमेराह गोल्फ इस्टेटमधील पॉश सँकच्युअरी फॉल्समध्ये आहे.

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Dubai is a luxurious villa
कोट्यावधींचे हॉलिडे होम
हे त्यांचे हॉलिडे होम आहे. या आलिशान व्हिलामध्ये एक मोठी बाग, स्विमिंग पूल आणि गोल्फ कोर्स आहे.या व्हिलाची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे सांगितले जातं आहे. हा कोट्यावधींचा व्हिला ऐश्वर्या आणि अभिषेकने लेक आराध्यासाठी खरेदी केला असल्याचं म्हटलं जातं.एवढंच नाही तर अभिषेक-ऐश्वर्याच्या या व्हिलाच्या शेजारीच शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टीचेही घर शेजारी आहेत.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अभिषेक शेवटचा रेमो डिसूझाच्या ‘ बी हॅपी ‘ चित्रपटात दिसला होता. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाचा एक भाग आहे. जरी त्याने अधिकृतपणे याची घोषणा केली नसली तरी त्याची खास झलक चित्रपटात दिसणार आहे.