ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, सलमान याच्या ‘त्या’ कृतीने सर्वांच्या भुवया उंचावल्या
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सतत चर्चेत आहेत. यांचे सध्या अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. आता त्यामध्ये एक नवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे सध्या जोरदार चर्चेत आहेत. यांच्या घटस्फोटाची सध्या चर्चा असल्याने चाहत्यांमध्ये चिंता बघायला मिळतंय. इतकेच नाही तर अनेक प्रोग्राममध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये पोहचताना दिसले. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकसोबत नव्हते. अभिषेक बच्चन याला बघून त्याच्या जवळ ऐश्वर्या राय गेली. मात्र, अभिषेक बच्चन हा तिला पाहून निघून जाताना दिसला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान वहायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ एका पार्टीमधील आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि सलमान खान हे दिसत आहेत. या व्हिडीओमधील सर्वात खास बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये चक्क अभिषेक बच्चन याची गळाभेट घेताना सलमान खान हा दिसला आहे.
सलमान खान हा अगोदर अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतो आणि त्यानंतर तो अभिषेक बच्चन याची गळाभेट घेतो. आता हा व्हिडीओ तूफान चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. पहिल्यांदाच सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांनी गळाभेट घेतली. सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
यामध्ये आता अभिषेक बच्चन आणि सलमान खान यांची ही गळाभेट तूफान चर्चेचा विषय ठरलीये. सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांचे एकच दु:ख असल्याने दोघांनी गळाभेट घेतल्याचे सांगितले जातंय. अनेकांनी थेट म्हटले की, अभिषेक बच्चन याच्यासाठी सलमान खान याला वाईट वाटले असल्याने त्याने ही गळाभेट घेतली.
मुळात म्हणजे अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केल्यानंतर फार जास्त अभिषेक आणि सलमान यांचा संपर्क नव्हता. मात्र, घटस्फोटाची चर्चा असतानाच आता सलमान खान याने अभिषेक बच्चन याची गळाभेट घेतल्याने लोकांना चांगलाच धक्का बसल्याचे दिसतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा व्हायरल होताना दिसतोय.