महागड्या हॉटेलमध्ये मजा केली; अभिषेक बच्चनचा ४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबतचा फोटो पाहून नेटकऱ्याने केली कमेंट
अभिषेक बच्चनचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमधील अभिनेत्रीला तो लग्नापूर्वी डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...

बॉलिवूड कलाकारांची नावे अनेकदा कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडली जातात. अभिषेक बच्चनचे नावही अनेक सौंदर्यवतींसोबत जोडले गेले आहे. ऐश्वर्या रायसोबत लग्न करण्यापूर्वी करिश्मा कपूरसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. सध्या सोशल मीडियावर असा एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांनी अभिषेक त्याच्या पेक्षा वयाने ४ वर्षांनी मोठ्या तब्बूला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. त्या फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
खरंतर होळीनंतर अभिषेक बच्चनचा त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी अभिनेत्री तब्बूसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तब्बूने पांढऱ्या रंगाचा ड्रेसमध्ये दिसत आहे. तर अभिषेक रंगीत कुर्ता परिधान केल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेता तब्बूचा हात धरून उभा आहे. अभिनेत्री देखील या क्षणाचा खूप आनंद घेताना दिसत आहे.




रेडिटवर हा फोटो व्हायरल झाला आहे
तब्बू आणि अभिषेक बच्चनच्या या व्हायरल फोटोवर सोशल मीडिया यूजर्सही प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने हा फोटो Reddit वर शेअर केला आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘2005 मध्ये होळी पार्टीत अभिषेक व तब्बू. त्यांनी पार्ट्यांमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवला आणि महागड्या हॉटेलमध्ये मजा केली.’ आता इतर Reddit वापरकर्ते या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट
एका यूजरने, ‘काय! हे कधी घडले? मला असे वाटते की 40 वर्षांपूर्वी त्याचे वडिल कामाता इतके व्यस्त होते की त्यांनी त्याच्याकडे लक्षही दिले नाही’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने, ‘तब्बूच्या अफेअर्सची माहिती देताना लिहिले की, ‘ती बायोपिकसाठी पात्र आहे. नागार्जुन, अजय आणि अभिषेक.’ आणखी एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, ‘तब्बू आणि अभिषेक, आता काय? माझ्या संपूर्ण आयुष्यात, मी त्यांच्याबद्दल ऐकले नाही, हे कधी घडले?’