Abhishek Bachchan | इथे कोणीच फ्लॉप… बॉक्स ऑफीस फेल्युअरबद्दल अभिषेक बच्चनने सोडले मौन !
Abhishek Bachchan On Flop Films : अभिषेक बच्चन सध्या त्याच्या घूमर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 18 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अगस्त को सिनेमाघरों में रिलीज हो रही है.

Abhishek Bachchan Break Silence : बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या घूमर (Ghoomar) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 18 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिषेकसह सैयामी खेर ही देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रटाद्वारे अभिषेक बच्चन बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. अभिषेक बच्चनने आत्तापर्यंत अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 2004 मध्ये आलेला त्याचा धूम हा चित्रपट अतिशय हिट ठरला. नुकत्याच एका मुलाखतीत अभिषेकने त्याच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल सांगितले.
‘ मी अशा घरातून आलो आहे जिथे वडिलांनी एकसाथ 17 हिट चित्रपट दिले आहेत. त्यातील चार एकाच महिन्यात रिलीज झाले तर तीन चित्रपट आधीपासूनच थिएटरमध्ये शानदारपणे चालत होते आणि तीन चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. धूम हा माझा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर आदित्य सक्सेस पार्टी दिली. मला आठवतं की मी घरी आलो तेव्हा माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला. ते पाहून मी निराश झालो – ते अमिताभ बच्चन होते.’
View this post on Instagram
प्रत्येक प्रोजेक्ट ठरावा बेस्ट
अभिषेक पुढे म्हणाला की, एखाद्या अभिनेत्याने कितीही हिट किंवा फ्लॉप चित्रपट दिले तरी हे लक्षात ठेवावे की त्या प्रोजेक्टमध्ये आपले बेस्ट काम करावे आणि मग पुढल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. कोणताही अभिनेता तुम्हाला सांगेल की जेव्हा तुमचा चित्रपट हिट होतो तेव्हा ही सर्वात अद्भुत भावना असते. तुम्हाला माहित आहे की हे (यश)जास्त काळ टिकणार नाही, ते आता झालं. भूतकाळात गेलं, आता तुम्हाला पुढल्या शुक्रवारकडे (पुढल्या चित्रपटाकडे) लक्ष केंद्रित करायचे आहे. आपण सगळेच यशस्वी चित्रपट बनवण्यासाठी काम करतो, फ्लॉप चित्रपट बनवण्यासाठी नाही. ‘मी लागोपाठ अनेक हिट चित्रपट दिलेत’, असं कधीही म्हणू नका. तुम्हाला प्रत्येक चित्रपटात उत्तम काम करायचं आहे, असं तो म्हणाला.
अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ या चित्रपटाविषयी सांगायचे तर, त्याचा चित्रपट पाच वर्षांनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. लुडो, द बिग बुल, टेन्थ हे सर्व त्याचे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. ब्रीद या वेब सीरिजमधून अभिषेकने ओटीटीवर पदार्पण केले.