‘आराध्या माझी लेक आहे म्हणून…’, ऐश्वर्या सोबत घटस्फोटाच्या चर्चा, भावूक अभिषेकने भावना केल्या व्यक्त

Abhishek Bachchan On Daughter Aaradhya Bachchan: ऐश्वर्या सोबत घटस्फोटाच्या चर्चा, भावूक अभिषेकने भावना केल्या व्यक्त, लेकीसाठी अभिनेता म्हणाला, 'आराध्या माझी लेक आहे म्हणून...', सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा...

'आराध्या माझी लेक आहे म्हणून...', ऐश्वर्या सोबत घटस्फोटाच्या चर्चा, भावूक अभिषेकने भावना केल्या व्यक्त
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 10:13 AM

Abhishek Bachchan On Daughter Aaradhya Bachchan: अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेता ‘आय वान्ट टू टॉक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच अभिषेक बच्चन सिनेमाच्या प्रमोशनसाठी महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कोन बनेगा करोडपती 16’ शोमध्ये उपस्थित होता. शोमध्ये अभिनेत्याने अनेक गोष्टी सांगितल्या… एवढंच नाही तर, लेक आराध्या हिच्याबद्दल बोलत असताना अभिनेता भावूक झाला.

अभिषेक बच्चन सिनेमाबद्दल म्हणाला…

अभिषेक बच्चन स्टारर ‘आय वान्ट टू टॉक’ सिनेमाची कथा एकट्आ वडिलांत्या प्रवासाभोवती फिरत आहे. सिनेमात अभिषेक यांनी अर्जुन सेन या भूमिकेला न्याय दिला आहे, जो स्वतःच्या मुलीसोबतच्या नात्यातल्या अंतराचा सामना करतो. अभिषेक म्हणाला, ‘अर्जुनचे पात्र पूर्णपणे त्याच्या मुलीला समर्पित आहे आणि तो त्याच्या मुलीला दिलेल्या वचनाशी जोडलेला आहे, की तो कायम तिच्यासोबत असेल.’

आराध्या हिच्याबद्दल अभिषेकचं भावूक वक्तव्य

सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता म्हणाला, ‘आराध्या माझी लेक आहे. शूजीत दा यांना देखील दोन मुलगी आहे. आम्ही ‘गर्ल डॅड’ आहोत. सिनेमातील वडिलांच्या भावना आम्ही समजू शकतो. सिनेमातील बाप ज्याप्रमाणे त्याच्या मुलीला वचन देत आहे, त्याच प्रमाणे मी देखील आराध्याला वचन दिलं आहे. मला आराध्याच्या लग्नात डान्स करायचा आहे…’ आराध्याबद्दल बोलताना अभिनेता भावूक झाला.

अभिषेक बच्चन याच्या वक्तव्यानंतर पुन्हा ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांपैकी कोणीच अधिकृत वक्तव्य केलं नाही. पण अमिताभ बच्चन यांनी रंगणाऱ्या चर्चांवर वक्तव्य केलं. ‘तर्क फक्त तर्क असतात… अफवांवर विश्वास ठेवू नका…’ असं अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलं…

अभिषेक बच्चन स्टारर ‘आय वान्ट टू टॉक’ सिनेमा

अभिषेक बच्चन स्टारर ‘आय वान्ट टू टॉक’ सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिषेक याच्यासोबत अहिल्या बामरू, बनिता संधू, जॉनी लीव्हर, पर्ल डे आणि पियरले माने यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन शूजीत सरकार यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.