अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, ‘ऐश्वर्या एकटीच सांभाळते मुलीला..’, कारण जाणून म्हणाल…
Bachchan Family : 2011 मध्ये ऐश्वर्या राय हिने दिला लेक आराध्या हिला जन्म... लेकीला एकटीच सांभाळते ऐश्वर्या राय... अभिषेक बच्चन याने सांगितलं सत्य... बच्चन कुटुंब कायम असतं चर्चेत...
मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल पैकी एक आहे. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल अनेक चांगल्या – वाईट गोष्टी चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अभिषेक – ऐश्वर्या यांची लेक आराध्या देखील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या हिला कायम लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. ऐश्वर्या कायम आराध्या हिचा हात धरुन चालताना दिसते. सोशल मीडियावर देखील दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय अभिषेक देखील पत्नी आणि लेकीबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
एका मुलाखतीत अभिषेक याने मोठा खुलासा केला आहे. आराध्या हिची संपूर्ण जबाबदारी तिची आई ऐश्वर्या हिच्यावर आहे. आराध्या जास्त वेळ तिच्या आईसोबतच असते. अभिषेक म्हणाला, ‘आराध्या तिच्या आईची प्रत्येक गोष्ट ऐकते. तिला तिच्या आईसोबत राहायला प्रचंड आवडतं. त्यामुळे मी देखील आराध्या हिची संपूर्ण जबाबदारी ऐश्वर्या हिच्या सोपावली आहे…’
पुढे अभिषेक म्हणाला, ‘माझ्या कामामुळे मी अधिक वेळ कुटुंबाला देऊ शकत नाही. म्हणून आराध्या तिच्या आईसोबत अधिक काळ असते. एक उत्तम व्यक्ती कसा घडतो… हेच ऐश्वर्या कायम आराध्याला सांगत असते.’ आराध्या हिच्या स्वभावाबद्दल देखील अभिषेक याने मोठं वक्तव्य केलं. अभिनेता म्हणाला, ‘आराध्या हिचा स्वभाव शांत आणि विनम्र आहे… याचं पूर्ण श्रेय मी ऐश्वर्या हिला देतो…’
ऐश्वर्या तिच्या मुलीची कायम काळजी करताना दिसते. याच कारणामुळे ऐश्वर्या हिला ओव्हरप्रोटेक्टिव आई म्हणून देखील ट्रोल करण्यात आलं. ऐश्वर्या ज्याठिकाणी जाते, तिच्यासोबत आराध्या कायम असते. ऐश्वर्या कधीच आराध्या हिला स्वतःच्या नजरेपासून लांब करत नाही.
ऐश्वर्या सतत आराध्या हिची घेत असलेली काळजी योग्य नाही… असं तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञ सांगातात, जर तुम्ही देखील मुलांची सतत काळजी करत असाल तर, ही सवय चुकीची आहे. कारण मुलं आत्मनिर्भर होत नाहीत. ते कायम त्यांच्या आई – वडिलांवर अवलंबून राहतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक – ऐश्वर्या यांची लेक आराध्या हिची चर्चा रंगली आहे.
आराध्या हिचा जन्म 2011 मध्ये झाला. आराध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टारकिडपैकी एक आहे. आराध्या हिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. सांगायचं झालं, आराध्या सध्या अंबानी शाळेत तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.