Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिषेक बच्चन थेट ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, तिने आराध्याला कायमच..

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर त्यांनी कायमच भाष्य करणे टाळले. काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिषेक बच्चन थेट ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, तिने आराध्याला कायमच..
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 10:55 AM

मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे सतत चर्चेत आहेत. आता अभिषेक बच्चन याने 48 व्या वयात पर्दापण केले. अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसाच्या दिवशी ऐश्वर्या राय हिने एक अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या सतत रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर यांच्यामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय. ऐश्वर्या राय हिने शेअर केलेली पोस्ट पाहून लोकांना मोठा आनंद झाला. कारण अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो आणि कॅप्शन ऐश्वर्याने शेअर केले.

नुकताच अभिषेक बच्चन याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलताना दिसला. अभिषेक बच्चन म्हणाला की, मी माझा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करू इच्छितो. मात्र, जर मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काम नाही केले तर तो माझ्यासाठी नक्कीच हॅप्पी नसणार. आराध्यामुळे माझा दिवस खूप खास गेला.

पुढे अभिषेक म्हणाला की, आराध्या आमच्या कुटुंबातील आणि जगातील सर्वात वंडरफुल वाईल्ड आहे आणि याचे सर्व श्रेय मी ऐश्वर्याला देऊ इच्छितो. कारण ऐश्वर्याने आराध्याला खूप जास्त चांगले संस्कार हे नक्कीच दिले आहेत. यानंतर थेट अभिषेक बच्चन याला विचारले गेले की, तुला ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करायला आवडले का?

यावर स्पष्टपणे बोलताना अभिषेक बच्चन हा म्हणाला की, मला बरेच मेल वगैरे येतात की, तुम्ही ऐश्वर्या राय हिच्यासोबत कधी काम करणार म्हणून? खरोखरच ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करायला आवडेलच…असो…पण यापुढे आम्ही एकसोबत स्क्रिन शेअर करू असेही अभिषेक बच्चन हा म्हणाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या जोरदार रंगताना दिसत आहेत. मात्र, ऐश्वर्या राय हिने शेअर केलेली ती पोस्ट आणि आता अभिषेक बच्चन याची ही मुलाखत पाहून सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसतंय. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असल्याचे देखील मध्यंतरी सांगितले जात होते.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.