ऐश्वर्या राय हिच्याबद्दल अभिषेक बच्चनचे मोठे भाष्य, म्हणाला, तिला माझ्याकडून परवानगी…
ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. ऐश्वर्या राय सोशल मीडियावरही चांगली सक्रिय दिसते.
ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचली. मात्र, यावेळी ती बच्चन कुटुंबियांसोबत पोहोचली नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामध्येच ऐश्वर्या मुलीसोबत अंबानींच्या फंक्शनला पोहोचली.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिचा पोन्नियन सेल्वन 2 हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट बघितल्यानंतर अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. चित्रपट जबरदस्त असल्याचे त्याने म्हटले आणि ऐश्वर्या राय हिच्या अभिनयाचे काैतुक देखील केले. त्यानंतर एका युजर्सने अशी काही कमेंट केली की, त्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली.
अभिषेक बच्चन याच्या पोस्टवर कमेंट करत एकाने लिहिले की, आता ऐश्वर्याला चित्रपट साईन करूद्या आणि तुम्ही मुलगी आराध्या हिच्यावर लक्ष द्या. यावर रिप्लाय देत अभिषेक बच्चन याने लिहिले की, तिला साईन करू देऊ? सर, तिला एखादी गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीची अजिबातच गरज नाहीये. विशेष: ज्याच्यावर ती प्रेम करते.
अभिषेक बच्चन याने केलेल्या या कमेंटनंतर लोक त्याचे जोरदार काैतुक करताना दिसले. सर्वांनी म्हटले होते की, पती असावा तर असा…अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही थेट विदेशात गेली. मुलगी आराध्या आणि ऐश्वर्या राय खास लूकमध्ये विमानतळावर स्पॉट देखील झाल्या.
मध्यंतरी अशी एक चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे आणि ती आपल्या आईच्या घरात शिफ्ट झाली आहे. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार का हा प्रश्नही चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.