Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनकडे करोडोची संपत्ती, अलिशान गाड्या आणि बरंच काही…

अभिषेक बच्चन याच्याकडे आणि एकूणच बच्चन कुटुंबाकडे किती संपत्ती असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनकडे करोडोची संपत्ती, अलिशान गाड्या आणि बरंच काही...
अभिषेक बच्चन
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 11:30 AM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा सुपुत्र अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्याकडे आणि एकूणच बच्चन कुटुंबाकडे (Bachchan Family) किती संपत्ती असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. खरंतर अमिताभ बच्चन या नावाचं बॉलिवूडमध्ये वलय आहे. त्यांनी बॉलिवूडला आजपर्यंत अनेक दर्जेदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असणारी संपत्तीही अधिक आहे. त्यांचा पुत्र अभिषेक देखील मागच्या 20 वर्षांपासून बॉलिवूडमध्येच काम करतो. त्यामुळे अभिषेकने स्वत: च्या कमाईवर स्वत: काही गोष्टी खरेदी केल्या आहेत. अभिषेक बच्चनला अलिशान गाड्यांचा, चांगल्या राहणीमानाची आवड आहे. याच आवडीतून त्याने काही गाड्या खरेदी केल्या आहेत. या व्यतिरिक्त अभिषेकचं एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. या सगळ्यातून कमावलेली जवळपास 203 कोटींहून अधिक संपत्ती आहे.

अभिषेक बच्चनची संपत्ती अभिषेककडे जवळपास 203 कोटींहून अधिक संपत्ती आहे. तो दरमाह 2 कोटी रूपये कमावतो तर वर्षाकाठी त्याच्याकडे 24 कोटींची जमापुंजी तयार होते. याविषयीची माहिती CAknowledge.com या साईटने दिली आहे.

अलिशान गाड्या आणि बंगले

आपण जाणतो की, बच्चन कुटुंब मुंबईत राहतं. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या असं हे बच्चन कुटुंब जुहूतील ‘जलसा’ नावाच्या आलिशान बंगल्यात राहतं. त्यांच्याकडे ‘प्रतीक्षा’ हाही एक बंगला आहे. याशिवाय त्यांच्याकडे जवळपास 5 बंगले आहेत. अभिषेकला महागड्या गाड्यांची आवड आहे. अभिषेककडे ऑडी A8L, मर्सडीज बेंज SL350d, मर्सडीज बेंझ AMZ यासह अनेक महागड्या गाड्या आहेत.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये लग्न केलं. त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. अभिषेकला त्याच्या कुटूंबासोबत वेळ घालवायला आवडतं. त्यामुळे तो कितीही बिझी असला तरी आपल्या घरच्यांना आवर्जून वेळ देतो. आज अभिषेकचा 46 वा वाढदिवस आहे.

संबंधित बातम्या

Abhishek Bachchan Birthday : नकली हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज, अभिषेक ऐश्वर्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’!

Rocket Boys Review : होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांचा संघर्ष पाहायचा असेल तर अजिबात चुकवू नका ही वेबसिरिज