निम्रतसोबत अफेअरच्या चर्चांवर अभिषेक का गप्प? बच्चन कुटुंबीय नाराज, करणार कायदेशीर कारवाई

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी 'दसवी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. निम्रतसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिषेकने अद्याप मौन का बाळगलंय, असा प्रश्न चाहत्यांकडून केला जात होता.

निम्रतसोबत अफेअरच्या चर्चांवर अभिषेक का गप्प? बच्चन कुटुंबीय नाराज, करणार कायदेशीर कारवाई
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 3:42 PM

अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. या चर्चांवर अद्याप अभिषेक किंवा ऐश्वर्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अभिषेकचं नाव आता अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता बच्चन कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व गोष्टींचा बच्चन कुटुंबीयांवर काय परिणाम होतोय, याविषयी त्याने सांगितलं आहे. बच्चन कुटुंबाच्या या जवळच्या व्यक्तीने ‘टाइम्स नाऊ’ला मुलाखत दिली असून त्यात त्याने निम्रतसोबत अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे. निम्रत आणि अभिषेकच्या नात्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय.

अभिषेक सध्या त्याच्या खासगी आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा सामना करत असल्याने त्याने कोणत्याही वादात अडकू नये असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. म्हणूनच तो निम्रत प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये. “या अफवांमध्ये कणभरही तथ्य नाही. आम्हाला आश्चर्य वाटतंय की त्या महिलेनं अद्याप या चर्चांना नाकारलं का नाही? अभिषेक मौन बाळगून आहे कारण त्याच्या खासगी आयुष्यात आधीच खूप समस्या आहेत. त्याला कोणत्याही नव्या वादात न अडकण्याचा सल्ला देण्यात आला आहे”, असं ती व्यक्ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

बच्चन कुटुंबाच्या या जवळच्या व्यक्तीने असंही म्हटलंय की अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक कधीच करणार नाही. अभिषेक त्याच्या नात्यात नेहमीच प्रामाणिक राहिला आहे. त्यामुळे सध्या ज्या काही चर्चा होत आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. “ही अफेअरची चर्चा कधी आणि कुठून सुरू झाली? अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक करणाऱ्यांपैकी नाही. तो पूर्पणे प्रामाणिक आहे. अभिषेकच्या वैवाहिक आयुष्यात आधीच वादळ आलं असताना तो असं का करेल”, असा प्रतिप्रश्न संबंधित व्यक्तीने केला. या अफवांमुळे बच्चन कुटुंबीय खूप नाराज असल्याचंही त्याने म्हटलंय.

“ज्यांनी जया बच्चन यांच्या आईच्या निधनाची अफवा पसरवली आहे, त्यांचाही शोध लावला जाईल. जया बच्चन यामुळे प्रचंड रागात आहेत. ही अफवा कोणी पसरवली याचा ते शोध घेत आहेत. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल”, असंही त्यांनी म्हटलंय.

'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली.
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला.
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर.
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला.
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज.
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'.
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत.
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?.