IND vs PAK | ‘विराट, तुला सात खून माफ’; टीम इंडियाच्या विजयावर बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड सेलिब्रिटींनी गायलं विराटचं गुणगान; विजयानंतर लिहिलेले पोस्ट वाचा

IND vs PAK | 'विराट, तुला सात खून माफ'; टीम इंडियाच्या विजयावर बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव
टीम इंडियाच्या विजयावर बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 8:00 PM

मुंबई- दिवाळीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. या विजयानंतर देशभरात आणि सोशल मीडियावर एकच जल्लोष साजरा केला जात आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकारांनी पोस्ट लिहित आनंद व्यक्त केला. अभिषेक बच्चन, सुष्मिता सेन, फरहान अख्तर, जावेद अख्तर यांनी विराट कोहली आणि टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सामन्यात भारताने चार गडी राखून विजय मिळवला. तर विराट कोहलीने नाबाद 82 धावा केल्या होत्या.

‘किंग कोहली’, असं ट्विट अभिषेक बच्चनने केलं. तर ‘विराट तुला सात खून माफ, तुझे खूप खूप आभार. जीते रहो’, अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

‘टीम इंडियाला शुभेच्छा. विराट खराखुरा किंग ठरला. दिवाळीचा आनंद दुप्पट झाला आहे. सर्वत्र पटाखे फुटत आहेत’, असं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने लिहिलं. ‘मी आतापर्यंत पाहिलेला हा सर्वोत्तम सामना होता’, अशा शब्दांत रितेश देशमुखने आनंद व्यक्त केला.

सुष्मिता सेन, प्रिती झिंटा, फरहान अख्तर यांनीसुद्धा ट्विट करत आनंद व्यक्त केला. सेलिब्रिटींनी विराट कोहलीचं भरभरून कौतुक केलं.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर चार विकेट्स राखून विजय मिळवला. विराट या सामन्याचा खरा हिरो ठरला. हरलेली मॅच विराटने टीम इंडियाला जिंकून दिली. 53 चेंडूत त्याने नाबाद 82 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकार होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.