मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घूमर या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे घूमर हा चित्रपट आजच रिलीज झालाय. चाहते हे अभिषेक बच्चन याच्या घूमर चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. अभिषेक बच्चन हा घूमर चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. निर्मात्यांना घूमर चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. आता हा चित्रपट नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
अभिषेक बच्चन हा नुकताच एका मुलाखतीमध्ये वडील अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा करताना दिसला आहे. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन याला विचारण्यात आले की, आताही अमिताभ बच्चन हे तुम्हाला ओरडतात का? यावर अभिषेक बच्चन याने जबरदस्त असे उत्तर देत उपस्थितांचे मन नक्कीच जिंकली आहेत.
अभिषेक बच्चन हा म्हणाला की, मुळात म्हणजे मुले कितीही मोठी झाली तरीही आई वडिलांसाठी ती कायमच लहान असतात. नेहमीच त्यांची काळजी आई वडिलांना वाटत असते आणि त्यांना कधीच वाटत नाही की, माझा मुलगा हा आता मोठा झाला आहे. विशेष म्हणजे माझे वडील हे मला आतापर्यंत कधीच रागावले नाहीत.
कधी माझ्यावर तशी वेळेच आली नाही की, त्यांनी मला ओरडले म्हणून. त्यांनी जोरात अभिषेक म्हटले तरीही मी घाबरतो. कारण त्यांचा आवाज तेवढा बुलंद नक्कीच आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यामध्ये कधीच अजूनही माझ्यावर साधा हात देखील उचलला नाहीये. अभिषेक बच्चन हा पहिल्यांदाच वडिलांबद्दल खुलासा करताना दिसला आहे.
काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, आता आई जया बच्चन यांच्याप्रमाणेच अभिषेक बच्चन हा लवकरच राजकारणात एंट्री करणार आहे. फक्त राजकारणामध्ये एंट्रीच नाही तर चक्क आगामी निवडणूकही अभिषेक बच्चन हा लढणार असल्याचे सांगितले जात होते. यावर लवकरच अभिषेक बच्चन याच्याकडून खुलासा केला जाणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
अभिषेक बच्चन हा अखिलेश यादव याच्या समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. 2024 ची निवडणूक अभिषेक बच्चन हा प्रयागराजमधून लढणार असल्याचे सांगितले जातंय. तेंव्हापासून अभिषेक बच्चन हा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे, तेंव्हापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. आता बाॅलिवूडनंतर राजकारणात धमाका अभिषेक बच्चन हा करेल.