Abhishek Bachchan याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन; संपत्तीचा आकडा थक्क करणारा

अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय नसताना देखील 'या' मार्गाने कोट्यवधी रुपये कमावतो, अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा...

Abhishek Bachchan याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन; संपत्तीचा आकडा थक्क करणारा
Abhishek Bachchan याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन; संपत्तीचा आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 1:56 PM

abhishek bachchan net worth : अभिनेता अभिषेक बच्चन आज स्वतःचा ४६ वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. अभिषेक बच्चन याचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये झाला. अभिषेक याने त्याच्या करियरची सुरुवात ‘रिफ्यूजी’ सिनेमातून केली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण तरी देखील अभिनेत्याने मागे वळून पाहिलं नाही. एक अशी वेळ आली, जेव्हा अभिनेत्याचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होता. अभिषेक याचे एकामागे एक सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते. अशा परिस्थित अभिनेत्यावर ‘फ्लॉप हीरो’ असा टॅग लागला. एक मोठा अभिनेता असून देखील अभिषेक याला अपयशाचा सामना कराला लागला.

मिळत असलेल्या अपयशानंतर अभिषेक बच्चन याला अनेक निर्मात्यांनी सिनेमात संधी देणं नाकारलं. पण एक दिवस प्रत्येकाचा येतोच. असं अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत देखील झालं. ‘पा’, ‘दसवीं’, ‘बंटी और बबली’, ‘ब्लफमास्टर’, ‘धूम’ आणि ‘गुरू’ या सिनेमांमुळे अभिषेक याच्या नावापुढे लागलेला ‘फ्लॉप हीरो’ असा टॅग चाहत्यांनी हटवला.

आज अभिषेक अनेक सिनेमांमध्ये दिसत नाही, पण अभिनेता नवीन आलेल्या सिनेमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो. मिळालेल्या अपयशानंतर अभिषेक बच्चन याने इतिहास रचला. दिलीप कुमार यांच्यानंतर तीन वेळा फिल्मफेयर अवॉर्ड आपल्या नावावर करणार अभिषेक बच्चन दुसरा अभिनेता आहे.

आता कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या अभिषेक याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. शिवाय अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा देखील थक्क करणार आहे. अभिषेक याच्याकडे ऑडी ए8एल, मर्सडीज बेंझ, एसएल ३५० डी, मर्सडीज बेंझ एएमजेड यांसारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

अभिनेता कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. अभिनेता सिनेमात नाही तर, स्पोर्ट्सविश्वात अधिक सक्रिय आहे. अभिनेता अनेक यशस्वी स्पोर्ट्स संघांचा मालक आहे. ज्यामध्ये एक संघ प्रो-कब्बडीचा आहे. अभिनेत्याच्या या संघाचं नाव पिंक पँथर्स असं आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याची नेटवर्थ जवळपास २८ मिलियन आहे. अभिषेक एका महिन्याला तब्बल २ कोटी रुपये कमावतो असं देखील अनेकदा समोर आलं. अभिनेत्याच्या कमाईचा आकडा २०२२ मधील आहे.

अभिषेक बच्चन त्याच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत मोकळेपणाने शेअर करतो. अभिनेता पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची ओळख ‘धूम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (abhishek bachchan birthday videos)

२० एप्रिल २००७ साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर १६ नोव्हेंबर २०११ मध्ये ऐश्वर्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.