बच्चन कुटुंबात काय घडतंय? अभिषेकच्या पार्टीमधून ऐश्वर्या-आराध्या गायब

Abhishek Bachchan and Aishwarya Rai: बच्चन कुटुंबात काय घडतय? पार्टीतून बाहेर आलेला अभिषेक बच्चन कॅमेऱ्यात कैद, खास लोकांसोबत अभिनेत्याची पार्टी, पण कुठे आराध्या - ऐश्वर्या? चर्चांना उधाण, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

बच्चन कुटुंबात काय घडतंय? अभिषेकच्या पार्टीमधून ऐश्वर्या-आराध्या गायब
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 2:48 PM

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. बेस्ट सेलिब्रिटी कपल म्हणून ओळख असलेल्या ऐश्वर्या – अभिषेक विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान अभिषेक बच्चन याचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिषेक बच्चन, भाचा अगस्त्य नंदा, भाची नव्या नवेली नंदा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान देखील दिसत आहे.

सध्या अभिषेक, नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिषेक मामाचं कर्तव्य पार पाडताना दिसत आहे. अभिषेक बच्चन याला नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांच्यासोबत डीनर पार्टी करताना स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सेलिब्रिटींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, अभिषेक, नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांपैकी कोणीच पापाराझींना पोज दिल्या नाहीत. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर चौघेही कारमध्ये बसले आणि निघाले. फोटोमध्ये नव्या, अगस्त्य आणि सुहाना यांच्यासाठी अभिषेक ड्राईव्ह करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोवर नेटकरी कमेंट करत अभिषेक याला ट्रोल करत आहेत. कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या आणि ऐश्वर्या कुठे आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अभिषेक कधी ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत बाहेर का नाही जात?’.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अभिषेक याने सोशल मीडियावर घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर चर्चांनी अधिक जोर धरला. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक आणि दोन्ही कुटुंबाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील बच्चन कुटुंब एकत्र दिसलं. पण ऐश्वर्या नंतर मुलगी आराध्या हिच्यासोबत लग्नात आली. तेव्हा देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होती. सोशल मीडियावर देखील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये मोठ्या थाटात ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. आजही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये आराध्या हिला जन्म दिला. आराध्या आता 13 वर्षांची आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.