बोलण्यासाठी खूप काही आहे, पण…, ‘तो’ फोटो पोस्ट करत अभिषेकचं मोठं वक्तव्य
Abhishek Bachchan: ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, निम्रत कौरसोबत अफेअरच्या चर्चा... अभिषेक बच्चन 'तो' फोटो पोस्ट करत म्हणाला, बोलण्यासाठी खूप काही आहे, पण..., सध्या सर्वत्र अभिषेकच्या खासगी आयुष्याची चर्चा...
Abhishek Bachchan: अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकीकडे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे, तर दुसरीकडे अभिनेत्री अभिषेक बच्चन याचं नाव अभिनेत्री निम्रत कौर यांच्यासोबत जोडलं जात आहे. पण यावर कोणीच अधिकृत वक्तव्य केलेलं आहे.
अभिषेक बच्चन याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असताना अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमधील अभिषेकच्या वेगळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्याचा सध्या व्हायरल होत असलेला फोटो आगामी सिनेमातील आहे.
फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘बोलण्यासाठी खूप काही आहे. पण एक फोटो हजारो शब्द बोलून जातो…’ असं लिहिलं आहे. अभिषेक याच्या आगामी सिनेमाचं नाव ‘आय वॉन्ट टू टॉक’ असं आहे. सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
अभिषेकने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘जया बच्चन यांना विचारल्याशिवाय तू काही बोलू शकतोस का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला देखील पाहयचं आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्याला म्हणत असेल आपल्याला बोलायला हवं…’
सांगायचं झालं तर, अभिषेकच्या खासगी आयुष्यासोबत प्रोफेशनल आयुष्याची देखील चर्चा रंगली आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक ‘ सिनेमा शुजीत सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे. तर सिनेमात अभिषेक बच्चन याच्यासोबत अलावा पर्ले डे, अहिल्या बमरू, जयंत कृपालन, कृष्टिन गॉडआर्ड आणि जॉनी लीव्हर मुख्य भूमिकेत आहेत.
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी लग्न केलं. पण आता दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.