‘तू माझं आयुष्य उद्ध्वस्त…’, करीना कपूरला असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
Abhishek Bachchan and Kareena Kapoor: करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांचं काय आहे कनेक्शन? अभिषेक का ठरवतोय करीनाला जबाबदार, म्हणाला, 'तू माझं आयुष्य उद्ध्वस्त...', चर्चांचा उधाण
अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून पत्नी ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. अभिषेक – ऐश्वर्या यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं असून 17 वर्षांच्या वैवाहिक नात्याचा अंत होणार… अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. तर काही चाहते रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत… असं देखील म्हणत आहे. याचदरम्यान, अभिषेक बच्चन याच्या एक वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. हे वक्तव्य अभिषेक याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासाठी केलं होतं. तर प्रकरण नक्की काय होतं? जाणून घेऊ…
अभिषेक बच्चन आणि करीना कपूर यांनी ‘रिफ्यूजी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा एक रिफ्यूजी आणि पाकिस्तानी मुलीच्या प्रेमकथेवर आधारलेला आहे. सिनेमाची कथा आणि सिनेमातील भावपूर्ण संगीत आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, तेव्हा अभिषेक याचा साखरपुडा करीनाची बहीण करिश्मा हिच्यासोबत झाला होता. ‘रिफ्यूजी’ सिनेमानंतर अभिषेक सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये पोहोचला होता. तेव्हा अभिषेकने करीनाचं कौतुक केलं. शिवाय ‘तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यासाठी मी तूला माफ करणार नाही…’ असं देखील अभिषेक म्हणाला.
मुलाखतीत, करीनाला एका गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही… असं अभिनेता म्हणाला होता, ‘सिनेमातील एका सीननंतर मला उद्ध्वस्त केलंस त्यासाठी मी करीनाला कधीच माफ करणार नाही. करीना मला म्हणाली होती एबी, हा आपला पहिला रोमँटिक सीन आहे आणि मी तुझ्या प्रेमात कशी पडू शकते. तू माझ्या भावासारखा आहेस…’ असं अभिनेता म्हणाला.
‘रिफ्यूजी’ सिनेमानंतर अभिषेक – करीना ‘मै प्रेम की दिवानी हूं’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले. पण त्यानंतर अभिषेक – करीना ही जोडी कधीच चाहत्यांच्या भेटीस आली नाही. कारण अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा मोडला होता. पण ‘अभिषेक माझ्यासाठी खास राहिल…’ असं वक्तव्य करीना हिने केलं होतं.
अभिषेकबद्दल करीना म्हणाली होती, ‘अभिषेक पहिला अभिनेता आहे, ज्याच्यासोबत मी पहिला सीन शूट केला आहे. माझ्या मनात कायम त्याच्यासाठी खास जागा असेल. कोणता दुसरा अभिनेता किंवा व्यक्ती माझ्या मनात असलेली अभिषेकची जागा घेऊ शकत नाही. पण आता काही गोष्टी वाईट मार्गावर गेल्या आहे… पुढे अभिषेक कधी एकत्र काम करण्यास नकार देईल तर मी समजून जाईल…’
‘कारण यामागचं कारण मला माहिती आहे आणि त्याचा मी आदर देखील करते. कारण माझ्याकडून देखील अभिषेक याच्यासोबत स्क्रिन शेअर करणं आता शक्य नाही…’ असं देखील करीना म्हणली होती. करिश्मासोबत साखरपुडा तुटल्यामुळे अभिषेक – करीना पुन्ही कधीच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले नाहीत.