Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आयुष्याच्या चाकोरीत अडकलोय..”; ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं वक्तव्य चर्चेत

ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन पहिल्यांदाच एका कार्यक्रमात पत्रकारांसमोर आला. आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आयुष्याच्या चाकोरीत अडकलोय..; ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं वक्तव्य चर्चेत
Abhishek and AishwaryaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 12:57 PM

अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. ‘पिकू’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार अभिषेकच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने बरंच वजन वाढवलं होतं. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिषेक त्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. शूजितच्या या चित्रपटात काम करताना तुला काय शिकायला मिळालं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना अभिषेक आधी मस्करीत म्हणाला, “पुन्हा कधीच चित्रपटासाठी वजन वाढवू नका. खरंच, या वयात पुन्हा वजन कमी करणं खूप कठीण होतं.” यानंतर तो पुढे म्हणतो, “हा चित्रपट तुम्हाला या गोष्टीचं आश्वासन देईल की आयुष्यात प्रत्येकासाठी एक छोटीशी जागा असते. यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही साधर्म्य आढळेल अशी माझी अपेक्षा आहे. आपण सर्वजण आयुष्याच्या एका चाकोरीत अडकलोय आणि जे आपण करत आलोय तेच सतत करतोय. काहीजण कॉर्पोरेट जॉब करतायत, काही कलाकार आहेत. तुम्ही काय आणि कसं करावं हे तुमचं आयुष्य ठरवतंय.”

हे सुद्धा वाचा

गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. त्यावर अद्याप दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र या चर्चांदरम्यान अभिषेकने त्याच्या चित्रपटाच्या अनुषंगाने मांडलेलं हे मत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

शूजितसोबत काम केल्यानंतर चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचं अभिषेकने सांगितलं. “आयुष्यात तुम्ही जे काही कराल, ते अविस्मरणीय असलं पाहिजे. बिझनेस, स्पोर्ट्स, फिल्म्स.. कोणत्याही क्षेत्रातील यश किंवा अपयश हे तुमच्या हातात नसतं. पण तुम्ही जे काम करताय ते काम मनापासून करणं आणि त्यातून चांगल्या आठवणी निर्माण करणं हे तुमच्या हातात आहे”, असं मत त्याने यावेळी मांडलं.

गेल्या सहा वर्षांत अभिषेकचे फक्त दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मनमर्जियाँ आणि घूमर हे त्याचे दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले. याशिवाय ‘द बिग बुल’, ‘ल्युडो’, ‘बॉब बिस्वास’ आणि ‘दसवी’ हे त्याचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अभिषेक लवकरच शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्यासोबत सुजॉय घोषच्या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय त्याचा ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.