अपयशी ठरण्याची भीती… ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची क्रिप्टीक पोस्ट
बच्चन कुटुंबियामधील वादाच्या चर्चांना जोर.. अनेक दिवसापासून अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात तणावाची चर्चा.. दोघं वेगळे होत असल्याच्या अफवाही पसरल्या.. मात्र दौघांनीही राखले मौन... त्यातच आता अभिषेकने शेअर केली ती पोस्ट.. नव्या चर्चा सुरू
मुंबई | 26 जानेवारी 2024 : अभिषेक बच्चन गेल्या काही काळापासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे.हे प्रकरण एवढं वाढलंय की दोघंही वेगळे होण्याचा विचार करत असल्याचीही माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पण बच्चन कुटुंबीय किंवा अभिषेक अथवा ऐश्वर्याने अद्याप या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पण त्याच दरम्यान अभिषेक बच्चने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. अभिषेक त्या पोस्टमध्ये अपयशाबद्दल भाष्य केले आहे. जीवनातील अपयशाबद्दलची त्याची ही पोस्ट वाचून त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, तो यातून काय सूचित करू इच्छितो हाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.
काय आहे अभिषेकची पोस्ट ?
अभिषेक बच्चनने गुरुवारी इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. 25 जानेवारी 2024 रोजी त्याने आनंद चुलानी यांनी लिहिलेल्या ओळी शेअर केल्या. जिथे तो आयुष्यातील अपयशांबद्दल बोलला आहे. ‘अपयशाची भीती तुमची स्वप्ने नष्ट करेल. अपयशातून धडा घेतल्यास तुमची स्वप्ने पूर्ण होतील.’ असे त्या पोस्टमध्ये लिहीण्यात आले आहे. मात्र या पोस्टचा रोख कोणाकडे आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
कशी सुरू झाली अभिषेक-ऐश्वर्याबद्दल गॉसिप्स ?
बऱ्याच दिवसांपासून बच्चन कुटुंबाबाबतील वादाबाबत गॉसिप सुरू आहे. त्यांच्यातील मतभेदाच्या बातम्याही आल्या आहेत. पण एक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अभिषेक बच्चनच्या बोटात लग्नाची अंगठी नाही हे दिसल्यावर सर्वांनाच धक्का बसला आणि आणखीनच चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर तो अनेक कार्यक्रमांमध्ये त्याच्या लग्नाच्या अंगठीशिवाय दिसला होता.
बिग बींनी लेकीला दिला बंगला
याच गॉसिपदरम्यान अमिताभ बच्चन यांनीही एक मोठा निर्णय घेतला. बिग बींनी त्यांचा खास बंगला ‘प्रतीक्षा’ मुलगी श्वेता नंदा बच्चनच्या नावावर केला आहे. हे घर जलसाकजवळच आहे. जे बच्चन कुटुंबासाठी खूप खास आहे. त्याची किंमत 50 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी तो बंगला मुलगी श्वेताला दिला आहे.
अर्थात, अभिषेक -ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबाबाबत गॉसिप्स सतत समोर येत असली तरीही अनेकदा ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र दिसले आहेत. तो अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचा ‘द आर्चिज’ चित्रपटाचा प्रीमिअर असो किंवा आराध्याच्या शाळेतील फंक्शन , सगळीकडे ते एकत्र दिसले.