ऐश्वर्याची ती गोष्ट अजिबात आवडत नाही.. नणंद श्वेता बच्चनकडून खुलासा

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यातील दुराव्याबद्दल चर्चा असतानाच बहीण श्वेता बच्चनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये श्वेताने ऐश्वर्याबद्दल कोणती गोष्ट आवडत नाही, त्याचा खुलासा केला. यावेळी अभिषेकसुद्धा तिथे उपस्थित होता.

ऐश्वर्याची ती गोष्ट अजिबात आवडत नाही.. नणंद श्वेता बच्चनकडून खुलासा
अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या रायImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 2:11 PM

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या जोरदार चर्चा आहे. ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांपासून वेगळी आईच्या घरात राहत असल्याचंही म्हटलं जात आहे. अशातच सोशल मीडियावर ऐश्वर्याची नणंद आणि अभिषेकची बहीण श्वेता बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये श्वेता आणि अभिषेक यांनी एकत्र हजेरी लावली होती. या मुलाखतीत श्वेताने ऐश्वर्याची कोणती सवय आवडत नाही, त्याविषयी सांगितलं होतं. या मुलाखतीत तिला अभिषेक आणि ऐश्वर्यापैकी कोण उत्तम अभिनेता आहे, असाही प्रश्न विचारण्यात आला होता.

‘कॉफी विथ करण’च्या या एपिसोडमध्ये श्वेताने उत्तम अभिनेता म्हणून भाऊ अभिषेकच नाव घेतलं. त्याचवेळी ऐश्वर्याच्या वाईट सवयीबद्दल बोलताना श्वेता पुढे म्हणाली, “ऐश्वर्याने कॉल उचलला नसेल तर पुन्हा कॉल बॅक करायला खूप वेळ लावते. तिची हीच सवय मला अजिबात आवडत नाही.” या शोमध्ये श्वेताने ऐश्वर्याचं कौतुकसुद्धा केलं. “तिने स्वत:च्या हिंमतीवर सगळं कमावलं. ती स्ट्राँग महिला आणि उत्तम आई आहे”, असं ती म्हणाली. श्वेताचा मुलगा अगस्त्य नंदाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अगस्त्यने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. यावेळी ऐश्वर्यासुद्धा अगस्त्यला पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचली होती. अगस्त्य आणि ऐश्वर्याचा मजेशीर व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती गंमतीने त्याचे गाल ओढताना दिसली होती.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by S (@shwetabachchan)

अभिषेक आणि ऐश्वर्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलं आहे. हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांदरम्यान मुलगी आराध्याच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले होते. घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप बच्चन कुटुंबीयांपैकी कोणीत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांसोबत ‘जलसा’ बंगल्यात राहत नसल्याचंही म्हटलं जात आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....