घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलं वक्तव्य; म्हणाला “त्या एका गोष्टीसाठी मी तिचे..”

ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्याविषयी खास वक्तव्य केलं आहे. यावेळी त्याने ऐश्वर्याचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलं वक्तव्य; म्हणाला त्या एका गोष्टीसाठी मी तिचे..
Abhishek Bachchan with Aishwarya Rai and AaradhyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 12:46 PM

अभिषेक बच्चनचा ‘आय वाँट टू टॉक’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट भरघोस कमाई करण्यात अपयशी ठरत असला तरी समिक्षकांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटात एका आजारी पित्याची त्याच्या मुलीसोबत असलेल्या गुंतागुतीच्या नात्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक त्याच्या खऱ्या आयुष्यातील मुलीबद्दल मोकळेपणे व्य क्त झाला. यावेळी त्याने पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचेही आभार मानले. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “माझ्या जन्मानंतर आईने अभिनयक्षेत्रात काम करणं थांबवलं होतं. कारण तिला तिच्या मुलाबाळांसोबत अधिक वेळ घालवायचा होता. त्यामुळे बाबांच्या अनुपस्थितीची आम्हाला फार जाणीव झाली नाही.” आईबद्दल सांगतानाच अभिषेकने पुढे पत्नीचा उल्लेख केला. “माझ्या घरात मी स्वत:ला नशिबवान समजतो कारण मला बाहेर पडून चित्रपटांमध्ये काम करायला मिळतंय. पण मला माहित आहे की ऐश्वर्या घरी आराध्यासोबत असते आणि त्यासाठी मी तिचे मनापासून आभार मानतो. पण मला वाटत की मुलं या दृष्टीकोनातून याकडे पाहतात. ते आपल्याकडे तिसरी व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या आयुष्यातील पहिली व्यक्ती म्हणून पाहतात”, असं तो पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

एक पिता म्हणून आपला अनुभव सांगताना अभिषेक पुढे म्हणाला, “तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देतात. तुमच्या बाळासाठी तुम्ही गरज पडल्यास एका पायावरही पर्वत चढू शकता. मी हे सर्व महिला आणि मातांप्रती असलेल्या आदरामुळे बोलतोय. कारण ते जे करतात ते कोणीही करू शकत नाही. पण एक पिता ते सर्व शांतपणे करतो कारण त्याला ते कसं व्यक्त करावं किंवा प्रदर्शित करावं हे माहित नसतं. पुरुषांमध्ये हा एक दोष आहे. पण मुलं जसजशी मोठी होतात, तसतसं त्यांना वडिलांच्या दृढ स्वभावाबद्दल समजत जातं.”

लहानपणी वडील अमिताभ बच्चन यांनीसुद्धा मुलासाठी त्याग केल्याचं अभिषेकने या मुलाखतीत सांगितलं. “लहानपणी माझी आणि वडिलांची भेट काही आठवडे व्हायची नाही. ते माझ्या बाजूच्याच रुममध्ये झोपायचे. माझ्या आणि माझ्या बहिणीच्या रुमचा दरवाजा आणि मास्टर बेडरुमचा दरवाजा नेहमीच उघडा असायचा. आम्ही झोपल्यावर ते घरी परतायचे आणि आम्ही उठायच्या आधीच ते कामावर निघून जायचे. त्यांचं इतकं व्यग्र वेळापत्रक असतानाही मला शाळेतला असा एकही वार्षित दिवस किंवा बास्केटबॉल फायनल्स आठवत नाही, जेव्हा ते उपस्थित नव्हते. दिवसाअखेर ते नेहमी आमच्यासाठी हजर असायचे”, अशा शब्दांत अभिषेकने आठवण सांगितली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.