ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांबद्दल अभिषेक बच्चन गप्प का ?; चर्चांना उधाण
बच्चन कुटुंबियातील मतभेदांची चर्चा... ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेलाही उधाण.. बच्चन कुटुंबियांचं घर सोडून ऐश्वर्या दुसरीकडे रहात असल्याचेही वृत्त... मात्र ना ऐश्वर्या, ना अभिषेक.. दोघांपैकी कोणीच यावर मौन सोडलं नाही, गप्प बसण्याचं कारण तरी काय ?
मुंबई | 5 जानेवारी 2024 : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघेही निःसंशयपणे बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. ते त्यांच्या समजूतदारपणासाठी ओळखले जातात आणि त्यांचे खाजगी आयुष्य पापाराझी आणि सोशल मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकवेळा त्यांचे वैवाहिक जीवन अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासूनच बच्चन कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सर्व काही आलेबल नाही,अशा चर्चा सुरू झाल्या. एवढेच नव्हे तर ऐश्वर्या राय बच्चन ही बच्चन कुटुंबियांचं घर सोडून मुलगी आराध्या हिच्यासोबत वेगळी राहात असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
पण, आराध्याच्या शाळेच्या वार्षिक समारंभात ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकत्र दिसल्याने या अफवा निराधार असल्याचे म्हटले गेले. मात्र असं असलं तरी बच्चन कुटुंब आणि त्यांच्यातील वाद याबद्दल काही लोक अजूनही चवीचवीने चर्चा करताना दिसतात. घटस्फोटाच्या सततच्या अफवा पसरूनही, ऐश्वर्या किंवा अभिषेक यांच्यापैकी कोणीच त्यावर कधीही भाष्य केले नाही. आणि आता त्यांच्या गप्प राहण्यामागणचं कारण समोर आलं आहे.
ऐश्वर्याच्या त्या सल्ल्यामुळे अभिषेक गप्प ?
बच्चन कुटुंबियांसाठी अफवा या काही नवीन नव्हेत,मात्र तरीही ते मौन राखणं पसंत करतात. ऐश्वर्याबद्दल बोलायचं झालं तर ती मीडियाशी नेहमीच अंतर ठेवून वागते.एलिगन्स आणि ग्रेस यांचा मिलाफ असलेलं तिचं व्यक्तीमत्व आहे. तिची चित्रपटांची निवड, तिच्या मुलाखती आणि तिची आंतरराष्ट्रीय कीर्ती, बच्चन बहूबद्दलची प्रत्येक गोष्ट विस्मयकारक आहे. लेक आराध्याबाबत, तिची अतिकाळजी याबद्दल बरेच वेळा ऐश्वर्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागाला, मात्र तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ट्रोल्सचा सामना करण्याचे तिचे तत्वज्ञान सोपे आहे – (ट्रोल्सकडे) त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करा
अभिषेकने सांगितला तो मंत्र
काही वर्षांपूर्वी मुलाखतीत अभिषेक बच्चनने एक गोष्ट सांगितली होती. अफवांना सामोरं कसं जायचं, त्या कशा हँडल करायच्या याबद्दल त्याची पत्नी ऐश्वर्याने त्याला एक महत्वाचा सल्ला दिला होता. ‘अफवा या बदकाच्या पाठीवरून वाहणाऱ्या पाण्यासारख्या असतात.’ (फारशा टिकत नाहीत) त्याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीला सहन करावी लागणारी टीका किंवा नकारात्मकता हे त्यांना मिळणाऱ्या प्रेम आणि कौतुकाच्या तुलनेत नगण्य असते आहे. त्यामुळे टीकेकडे दुर्लक्ष करून जीवनातील सकारात्मक पैलूंवर नेहमी लक्ष केंद्रित केले पाहिजे. या अफवांना एखाद्या काळ्या ठिपक्याप्रमाणे मानावे, जो काळा (टीका) आपल्याला नजर लागू नये म्हणू लावला जातो. त्यामुळे त्याकडे सरळ दुर्लक्ष करावे, असा सल्ला ऐश्वर्याने अभिषेकला दिला होता.
याच कारणामुळे बच्चन दाम्पत्य त्यांच्या घटस्फोटाच्या सततच्या बातम्यांकडे, अफवांकडे का लक्ष देत नाही हे स्पष्ट होतं. ऐश्वर्याच्या सल्ल्याप्रमाणे चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करणे, हे बच्चन कुटुंबीय शिकले आहेत.