मुलाखत सुरु असतानाच ऐश्वर्याने अभिषेककडे मागितलं किस; त्यानंतर जे घडलं अँकरही झाली हैराण
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाखतीदरम्यानच ऐश्वर्या थेट अभिषेककडे किस मागते. त्यानंतर जे काही घडलं ते पाहून मुलाखत घेणारी अँकरही हैराण झाली. हा व्हिडीओ पाहून सर्व नेटकरी या जोडीला खूप प्रेम देताना दिसत आहे.

बॉलिवूडमधील एक असं कपल जे काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतं. एवढंच नाही तर हे कपल चाहत्यांची अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. ती जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. मध्यंतरी या दोघांमध्ये मतभेद असल्याने त्यांच्यातील नाते हे घटस्फोटापर्यंत गेलं असल्याचं म्हटलं जातं होतं. पण त्यानंतर ही जोडी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ऐश्वर्या अभिषेकच्या नात्याची चर्चा होत असताना त्यांचे अनेक नवीन जूने व्हिडीओ व्हायरल झाले, आजही त्यांच्या मुलाखतींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या जोडीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या अन् अभिषेकचा मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या शांत स्वभावासाठी आणि विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. पण त्यांचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ आहे त्यांच्या मुलाखतीचा. मुलाखतीदरम्यान कॅमेऱ्यासमोर त्यांनी असं काही केलं की, सगळेच हैराण झाले. मुलाखत सुरु असताना ऐश्वर्याने अभिषेकला चक्क किस मागितली. आणि हे पाहून सर्वांना थोडं आश्चर्य नक्कीच वाटलं. ही मुलाखत तेव्हाची आहे जेव्हा ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत प्रसिद्ध हॉलिवूड होस्ट ओप्रा विन्फ्रेच्या शोमध्ये गेले होते. ओप्रा विन्फ्रेचा हा शो जगभर प्रसिद्ध आहे आणि त्या खास भागात तिने ऐश्वर्या आणि अभिषेक यांना त्यांच्या नात्याबद्दल अनेक मनोरंजक प्रश्न विचारले होते. संभाषणादरम्यान, ओप्राने अचानक विचारलं, “तुम्ही दोघे कधीही कॅमेऱ्यासमोर एकमेकांना किस करताना दिसत नाही, असे का?” या प्रश्नावर सर्वच आश्चर्याने हसू लागले.
ऐश्वर्याने अभिषेककडे मागितलं किस अन्…
पण ओप्राच्या प्रश्नानंतर जे घडलं ते पाहून ती देखील हैराण झाली. ऐश्वर्याने अभिषेककडे हसत पाहिलं आणि त्याला सर्वांसमोर तिला किस करायला सांगितलं. त्यानंतर अभिषेकनेही ऐश्वर्याच्या गालावर प्रेमाने किस केलं.हा क्षण इतका सुंदर आणि प्रेमाच होता की कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रेक्षक आणि ओप्रा देखील थक्क झाली. ऐश्वर्या आणि अभिषेकची ही ट्यूनिंग आणि मजेदार शैली सर्वांना आवडली. तसेच पत्नी ऐश्वर्याला किस केल्यानंतर अभिषेकलाही हसू आवरत नव्हत तोही ब्लश करताना दिसत होता.
दोघांमधील केमिस्ट्रीचे कौतुक
व्हायरल झालेला व्हिडीओ जरी जुना असला तरी या दोघांमधले प्रेम पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावर केला आहे. चाहते या जोडप्याच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत. हा क्षण याचा पुरावा आहे की प्रेम आणि साधेपणा प्रत्येकाचे मन जिंकू शकतं. दरम्यान या जोडप्याचे लग्न 2007 मध्ये झाले आणि त्यांना आराध्या ही मुलगी आहे.