रितेश देशमुखने बाजू घेतल्यानंतर अंकिता लोखंडेनं त्याच स्पर्धकाला काढलं बिग बॉसच्या घराबाहेर
मुंबई : 6 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून घरातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार या तिघांमधील भांडणानंतर अनेकांनी सोशल मीडियावर अभिषेकचं समर्थन केलं. अभिनेता रितेश देशमुखसह बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनीही अभिषेकला पाठिंबा दिला होता. असं असूनही अखेर नुकत्याच पार […]
मुंबई : 6 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून घरातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार या तिघांमधील भांडणानंतर अनेकांनी सोशल मीडियावर अभिषेकचं समर्थन केलं. अभिनेता रितेश देशमुखसह बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनीही अभिषेकला पाठिंबा दिला होता. असं असूनही अखेर नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिषेकलाच घरातून बाहेर पडावं लागलं आहे. भांडणादरम्यान अभिषेकने समर्थच्या कानाखाली मारलं होतं. ईशा आणि समर्थ हे दोघं अभिषेकच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवरून खिल्ली उडवत होते. त्यावेळी राग अनावर झालेल्या अभिषेकने समर्थच्या कानशिलात लगावली. त्याने योग्यच केल्याचं अनेकजण म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अंकिता लोखंडेनं अभिषेकला घराबाहेर काढलं आहे. अभिषेकच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा, हे बिग बॉसने अंकिताला ठरवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर तिने त्याला बेघर केलं. आता प्रेक्षक अंकितावर भडकले आहेत. ‘हे चुकीचं आहे. तुम्ही अभिषेकला घराबाहेर कसं काढू शकता’, असा सवाल एकाने केला. तर ‘अभिषेकने अंकिताविरुद्ध आवाज उठवला होता, म्हणून त्याला तिने घराबाहेर काढलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अयोग्य एलिमिनेशन. त्याला घरात परत आणलं पाहिजे’ अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. ‘अभिषेकला घराबाहेर काढणार हे माहीत होतं. पण हा निर्णय अंकिताने का घ्यावा? याचा अर्थ प्रेक्षकांच्या वोटिंगला काहीच किंमत नाही का’, असा संतप्त सवाल काहींनी केला आहे.
Shame on makers @BiggBoss @ColorsTV for promoting bullies like Samarth, Vicky, Isha, Mannara & Ankita
Even after all this noone will take stand for #AbhishekKumar.. Salman wont
Ek tarah Abhishek regret mei hai in front of #MunawarFaruqui, dusri side besharmi😡#BiggBoss17 #BB17 pic.twitter.com/KXtYGTAkWs
— Anubhav K😈🇮🇳 (@Anubhav_Memerz) January 4, 2024
नेमकं काय घडलं?
ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल हे अभिषेकच्या मानसिक स्वास्थावरून खिल्ली उडवतात. भूतकाळात अभिषेकला मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्या होत्या. त्यावरूनच दोघांनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. ईशा अभिषेकला ‘मेंटल भोपू’ म्हणून चिडवते. त्यावर अभिषेक तिला उत्तर देतो, “तुझ्या प्रेमातच मी वेडा होतो. तू मला वेडा करून सोडलंस.” हे भांडण इतक्यावरच थांबत नाही. ईशा पुढे अभिषेकच्या वडिलांवरून कमेंट करते. “तुझ्या वडिलांनाही माहीत आहे की तू लहानपणापासूनच वेडा आहेस. सर्वांना माहीत आहे की तू वेडा आहेस.” अभिषेक कशाप्रकारे क्लॉस्ट्रोफोबिक असल्याचं नाटक करत होता हे सर्वांनी पाहिलं, असं ईशा म्हणते. यावर जेव्हा अभिषेक काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समर्थ त्याच्या तोंडात कागदाचा बोळा टाकतो. अभिषेक तोंडातील तो बोळा फेकून देतो आणि समर्थच्या कानाखाली मारतो.