Abhishek Malhan | बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांवर अभिषेक मल्हान याने केले अत्यंत गंभीर आरोप, थेट एल्विश यादव याच्याबद्दलही मोठे विधान
बिग बाॅस ओटीटी 2 धमाका करता दिसले. गेल्याच आठवड्यामध्ये बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले हा पार पडलाय आणि एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता ठरला आहे. मात्र, फिनालेला एक आठवडा होऊनही अजूनही सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बाॅस ओटीटी 2 चीच चर्चा आहे.

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 धमाका करताना दिसले. 14 आॅगस्ट रोजी बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले पार पडला. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. सर्वांना अगोदर हेच वाटत होते की, अभिषेक मल्हान हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता होईल. मात्र, एल्विश यादव (Elvish Yadav) याने बिग बाॅसच्या घरात पर्दापण करत मोठा धमाका हा केला आहे. चाहत्यांनी एल्विश यादव याला मोठे प्रेम देखील दिले. बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही देखील सहभागी झाली होती.
पूजा भट्ट हिला सपोर्ट करण्यासाठी बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात महेश भट्ट हे देखील आले होते. अगोदर एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये पूजा भट्ट ही सहभागी झाल्यामुळे महेश भट्ट हे तिच्यावर नाराज आहेत. मात्र, यानंतर स्वत: महेश भट्ट हे पूजाला सपोर्ट करण्यासाठी बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात गेल्याने या चर्चा बंद झाल्या.
अभिषेक मल्हान हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता होताना थोडक्यात राहिला आहे. नुकताच आता अभिषेक मल्हान याने बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. फक्त बिग बाॅसच्या निर्मात्यांवरच नाही तर चक्क बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव याच्याबद्दल देखील त्याने धक्कादायक विधान केले आहे.
अभिषेक मल्हान याने दहा मिनिटांच्या ब्लाॅगमध्ये मोठे खुलासा केले आहेत. अभिषेक मल्हान म्हणाला की, बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांनी माझ्याभोवती चुकीची स्टोरी तयार केली. इतकेच नाही तर निर्मात्यांनीच माझ्यामध्ये आणि एल्विशमध्ये चुकीचे वातावरण तयार केले. इतकेच नाही तर पूजा भट्ट आणि अविनाश सचदेवबद्दलही बोलताना अभिषेक दिसला.
अभिषेकने निर्मात्यांवर त्याच्या आणि एल्विशच्या फॅन आर्मीमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप देखील केला आहे. एल्विश यादव हा विजेता झाल्यापासून अभिषेक मल्हान हा नाराज झाल्याचे बघायला मिळत आहे. इतकेच नाही तर तो आता थेट बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांवर देखील आरोप करताना दिसत आहेत. एल्विशबद्दलही त्याने मोठे भाष्य केले.
अभिषेक म्हणाला की, एल्विश हा बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये वाइल्डकार्ड घरात दाखल झाला. मुळात म्हणजे त्याच्यासाठी सर्वकाही गोष्टी सोप्या नक्कीच होत्या. कारण त्याला सर्वकाही मिळत होते. एल्विश माझा भाऊ आहे आणि नेहमीच राहणार असल्याचे देखील म्हणताना अभिषेक हा दिसला. मात्र, अभिषेक याने केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का हा नक्कीच बसला आहे.