Ali Baba | अभिषेक निगम याचा मोठा खुलासा, म्हणाला, शीजान खान याने मला फोन करत थेट…

शीजान खान हा खतरो के खिलाडीमध्ये सहभागी झाला होता. तुनिशा शर्मा प्रकरणात शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. इतकेच नाही तर थेट जेलमध्ये राहण्याची वेळ देखील शीजान खान याच्यावर आली. आता मोठा खुलासा हा अभिषेक निकम याने केला आहे.

Ali Baba | अभिषेक निगम याचा मोठा खुलासा, म्हणाला, शीजान खान याने मला फोन करत थेट...
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 4:43 PM

मुंबई : तुनिशा शर्मा हिने अली बाबा: मालिकेच्या सेटवर आत्महत्या करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने आपल्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने अली बाबा मालिकेत तुनिशा शर्मा हिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर गंभीर आरोप (Serious charges) केले. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी शीजान खान याला अटक देखील केली. धक्कादायक म्हणजे पोलिसांना अशा काही गोष्टी शीजान खान (Sheezan Khan) याच्या मोबाईलमधून आढळल्या की, सर्वांनाच मोठा धक्का बसला.

तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या फक्त 15 दिवसांपूर्वीच यांचे ब्रेकअप झाले होते. यामुळेच तुनिशा शर्मा हिची निराश होती. इतकेच नाही तर आत्महत्या करण्याच्या 10 मिनिटे अगोदर ती शीजान खान याला भेटली होती आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली.

तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर जवळपास तीन महिने जेलमध्ये राहण्याची वेळ ही शीजान खान याच्यावर आली. यासर्व प्रकरणानंतर शीजान खान याच्या हातामधून अली बाबा मालिका गेली. शीजान खान याच्या जागी निर्मात्यांनी अभिषेक निगम याला साईन केले. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिषेक निगम याने मोठा खुलासा केला आहे.

अभिषेक निगम म्हणाला की, मी ज्यावेळी अली बाबा मालिकेला होकार दिला त्यावेळी माझ्या मनात अनेक प्रश्न सुरू होते. कारण मी ही मालिका साईन केल्यानंतर शीजान खान हा काय विचारेल माझ्याबद्दल करेल हे मला माहिती नव्हते. अगोदर त्याच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. कारण आम्ही एकाच जीममध्ये होतो आणि शेजारी देखील होतो. एकदम चांगले मित्र नक्कीच नाही पण आम्ही मित्र होतो.

एकेदिवशी मला एका वेगळ्याच नंबरवरून शीजान खान याचा फोन आला आणि त्याने मला धन्यवाद देत म्हटले की, तू मालिकेला पुढे नेतो आहेस धन्यवाद. तुझा लूकही मी बघितला छान वाटत आहे. यावर मी त्याला विचारले की, तु कशा आहेस? यावर तो म्हणाला की, मी फक्त तुझे आभार मानण्यासाठी फोन केला. शीजान खान याच्या या फोननंतर मला बरेच वाटले आणि मनातील विचार थोडे कमी झाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.