‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात; पन्हाळ गडाच्या तटबंदीवरून कोसळला तरूण

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. त्याच्यासोबतच जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत.

'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात; पन्हाळ गडाच्या तटबंदीवरून कोसळला तरूण
वेडात मराठे वीर दौडले सातच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटनाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 12:14 PM

कोल्हापूर : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कोल्हापुरातील पन्हाळगडावर या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. ही शूटिंग सुरू असताना 19 वर्षांचा एक तरुण किल्ल्याच्या तटबंदीवरून 100 फूट खाली कोसळला. सूत्रांच्या माहितीनुसार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला शहरातील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी तरुणाचं नाव नागेश खोबरे असं आहे. शनिवारी रात्री जवळपास नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. महेश मांजरेकर हे गेल्या काही दिवसांपासून पन्हाळगडावर त्यांच्या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. शनिवारी रात्री शूटिंगदरम्यान किल्ल्यावरील तटबंदीवरून तरुणाचा तोल सुटला आणि तो 100 फूट खाली कोसळला.

पन्हाळगडावरील शूटिंगसाठी काही घोडे त्याठिकाणी आणले होते. याच घोड्यांची देखभाल नागेश करत होता. फोनवर बोलून झाल्यानंतर तो सज्जा कोटीच्या उत्तर दिशेला असलेल्या तटबंदीवरून खाली येत असताना त्याचा तोल ढासळला. तिथे उपस्थित असलेल्यांनी ताबडतोब त्याची मदत केली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

खाली कोसळलेल्या नागेशला दोरीच्या सहाय्याने वर आणलं गेलं. या घटनेत नागेशच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. याप्रकरणी अद्याप महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया समोर आली नाही.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. त्याच्यासोबतच जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता.

राज ठाकरेंमुळे अक्षयला मिळाली भूमिका

“मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही राज ठाकरेंमुळे मिळाली. त्यांनी मला आश्वासन दिलं की तू ही भूमिका साकारू शकतोस. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेसाठी मी माझं सर्वस्व अर्पण करेन”, असं वक्तव्य अक्षयने चित्रपटाच्या घोषणेदरम्यान केलं होतं.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.