सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारचा मृत्यू? अमेरिकेत गोळ्या घालून हत्या, डल्ला लखबीर..
Goldy Brar Murder : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली होती. हेच नाही तर तशा प्रकारची एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. आता गोल्डी ब्रारबद्दल एक अत्यंत मोठी माहिती ही पुढे येताना दिसत आहे.
नुकताच एक बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसत आहे. वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार याची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे येतंय. गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार यानेच घेतली. हेच नाही तर विदेशात बसून भारतामध्ये गुन्हेगारी घटना गोल्डी ब्रार हा घडून आणतोय. लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख गोल्डी ब्रार असून तो विदेशात बसून काम करतो. असा दावा केला जातोय की, अमेरिकेत गोळ्या घालून गोल्डी ब्रारची हत्या करण्यात आलीये. रिपोर्टनुसार गोल्डी ब्रारच्या हत्येची जबाबदारी विरोधी गँग डल्ला-लखबीरने घेतलीये.
गोल्डी ब्रारची हत्या झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, गोल्डी ब्रारच्या हत्येबद्दल अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. सिद्धू मूसवाला हत्याकांडनंतर पोलिस गोल्डी ब्रारच्या शोधात होते. मात्र, तो गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. पंजाब पोलिसांसह इतर राज्यातील पोलिस गोल्डी ब्रारच्या शोधात होते. अनेक गुन्हांमध्ये त्याचे नाव पुढे आले.
हेच नाही तर केंद्र शासनाकडून दहशतवादी म्हणून गोल्डी ब्रारच्या नावाची घोषणाही करण्यात आली होती. सिद्धू मुसेवालाची भर रस्त्यामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर लोकांमध्ये मोठी दहशद बघायला मिळाली. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घेतली होती.
लॉरेन्स बिश्नोई गँग विदेशात बसून गोल्डी ब्रारच चालवत असल्याचे सांगितले जाते. गोल्डी ब्रारचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर आता हा मोठा धक्का लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी नक्कीच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर सलमान खानच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आला.
गोल्डी ब्रार हा मूळ पंजाबचा असून तो पंजाबच्या मुक्तसरचा आहे. हैराण करणारे म्हणजे त्याचे वडील हे पोलिस दलात कार्यरत होते. 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर तो कॅनडात गेला. श्रीमंत लोकांकडून पैसे काढणे, व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणे आणि गुन्हेगारी वाढवणे हे गोल्डी ब्रारच्या गँगचे काम आहे. गोल्डी ब्रारच्या हत्येप्रकरणात अजूनही काही मोठे अपडेट हे पुढे येऊ शकतात.