टप्पू सेनाचा लिडर, दयाबेन आणि जेठालालचा लाडका टप्पूडा झाला 26 वर्षांचा, भव्य गांधी याचे फोटो पाहून व्हाल हैराण

गेल्या कित्येक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा टप्पू सेना ही नेहमीच केंद्रस्थानी असते.

टप्पू सेनाचा लिडर, दयाबेन आणि जेठालालचा लाडका टप्पूडा झाला 26 वर्षांचा, भव्य गांधी याचे फोटो पाहून व्हाल हैराण
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 11:28 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका केल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन (Entertainment) करताना दिसत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांना ही मालिका प्रचंड आवडते. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील टप्पू सेना ही नेहमीच चर्चेचा विषय असते. टप्पू सेना ही नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक आदर्श समाजा पुढे ठेवण्याचा प्रयत्न करते. दिवाळीला अनाथ मुलांसोबत दिवाळी (Diwali) देखील साजरा करताना बऱ्याच वेळा टप्पू सेना ही दिसली आहे.

मालिकेच्या सुरूवातीला टप्पू आणि त्याची मित्र मंडळी ही वयाने लहान दाखवली होती. मात्र, आता टप्पू सेना ही मोठी झालीये. त्यांचे काॅलेज लाईफ देखील दाखवण्यात आले. टप्पू, सोनू, गोगी, पिंकू, गोली असे हे सदस्य टप्पू सेनामध्ये आहेत. मात्र, टप्पू सेनाचा बाॅस हा टप्पू हाच आहे. मालिकेत टप्पू हा जेठालाल आणि दयाबेनचा मुलगा दाखवला आहे.

भव्य गांधी हा मालिकेच्या सुरूवातीपासूनच टप्पू याची भूमिका साकारत होता. भव्य गांधी ज्यावेळी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत टप्पूचे पात्र साकारत होता, त्यावेळी तो खूप लहान होता. विशेष म्हणजे टप्पू सर्वांचा आवडता देखील होता. काही वर्षांपूर्वीच भव्य गांधी याने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला रामराम केला.

भव्य गांधी याने जरी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली असली तरीही त्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. भव्य गांधी हा मोठ्या पडद्यापासून गेल्या काही वर्षांपासून तसा दूर आहे. मात्र, असे असताना देखील तो कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.

विशेष म्हणजे दयाबेन आणि जेठालालचा लाडका भव्य गांधी ऊर्फ टप्पू हा आता 26 वर्षांचा झाला आहे. विशेष म्हणजे आता टप्पू याला ओळखणे देखील नक्कीच अवघड झाले आहे. भव्य गांधी याला सोशल मीडियावर 6 लाख 44 हजार लोक फाॅलो करतात. भव्य गांधी याचे चाहते आता त्याच्या दणदणीत पुनरागमनाची वाट ही आतुरतेने बघताना दिसत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडल्यापासून टप्पू हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, भव्य गांधी याला एका मोठ्या चित्रपटाची आॅफर आली असून लवकरच भव्य गांधी हा चित्रपटामध्ये धमाका करताना दिसू शकतो. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटात भव्य गांधी हा भूमिका करणार हे अद्याप कळू शकले नाहीये.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.