TJMM | अभिनेत्याने हद्दच केली पार; श्रद्धा कपूरच्या बिकिनी लूकची उडवली खिल्ली, भडकले चाहते

लव रंजनचे चित्रपट एकाच पठडीतील असले तरी प्रेक्षकांकडून त्यांना दमदार प्रतिसाद मिळतो. याआधी प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टिटू की स्विटी यांसारखे त्याचे रोमँटिक कॉमेडी चित्रपट हिट ठरले आहेत.

TJMM | अभिनेत्याने हद्दच केली पार; श्रद्धा कपूरच्या बिकिनी लूकची उडवली खिल्ली, भडकले चाहते
Shraddha KapoorImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 9:57 AM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. लव रंजन दिग्दर्शित हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात श्रद्धा अत्यंत ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळत आहे. जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हासुद्धा तिच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर चर्चा झाली. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा या चित्रपटातील श्रद्धाचा बिकिनी लूक चर्चेचा विषय ठरला आहे.

रणबीरवर केली टीका

रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट कसा आहे, हे सांगण्यासाठी स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्याने श्रद्धाच्या बिकिनी लूकची खिल्ली उडवली आहे. “लव रंजन साहेब सारखं त्याच्या चित्रपटाला पाण्यात घेऊन जातात. जिथे श्रद्धा कपूरला पाण्यात ढकललं जातं आणि रणबीर मात्र बाहेरच उभा असतो. कारण त्यांना माहित आहे की रणबीरला पाण्यात उतरवलं तर त्याचा विगसुद्धा (खोटे केस) उतरवला जाईल. तुम्ही अंजाना अंजानी हा चित्रपट पाहिला असेल, तर त्यातसुद्धा रणबीर कॅप घालून पाण्यात उतरला होता. तुम्हीसुद्धा त्याला कॅप घालून पाण्यात उतरवू शकला असता. मात्र तुम्हाला डोकं असेल तर असं केलं असतं ना”, अशा शब्दांत त्याने दिग्दर्शकावर टीका केली.

श्रद्धाची उडवली खिल्ली

केआरके इथेच थांबला नाही. पुढे श्रद्धा कपूरवर बॉडी शेमिंगची टिप्पणी करत तो म्हणाला, “श्रद्धाला सारखं बिकिनी लूकमध्ये दाखवलं गेलंय. लव रंजन साहेब, तुम्ही हे तरी सांगा की तुम्हाला नेमकं काय दाखवायचं आहे? ती ना दीपिका पदुकोण आहे, ना कतरिना कैफ आणि ना करीना कपूर.. मग तुम्हाला नेमकं दाखवायचं आहे तरी काय? जर त्या बिचाऱ्या मुलीकडे काहीच नाही, तर तुम्ही तिला सतत बिकिनी लूकमध्ये दाखवून काय सिद्ध करू इच्छिता?”

हे सुद्धा वाचा

कमाल आर. खानच्या या टिप्पणीवर नेटकऱ्यांनी आणि श्रद्धाच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही केआरकेला अशा प्रकारच्या कमेंट्समुळे कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. अभिनेता सलमान खानने केआरकेविरोधात खटला दाखल केला होता.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या चित्रपटाने 15.73 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातून निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्यासोबत डिंपल कपाडिया यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.