‘या’ अभिनेत्याने तब्बल 14 वर्षांपासून खाल्ला नाही समोसा, मोठा खुलासा, म्हणाला..
नुकताच एका अभिनेत्याने मोठा खुलासा केला. आता अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. हेच नाही तर फिटनेससाठी आपण काय काय करतो हे सांगताना अभिनेता दिसत आहे. शूटिंगमध्ये कितीही जास्त बिझी असले तरीही वर्कआऊट करत असल्याचे अभिनेत्याने सांगितले.
अभिनेते कायमच आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतात. हेच नाही तर अनेक गोष्टी खाणेही टाळतात. आता नुकताच एका अभिनेत्याने मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर आपल्या फिटनेससाठी एका अभिनेत्याने समोसा गेल्या 14 वर्षांपासून अजिबातच खाल्ला नाहीये. हेच नाही तर या अभिनेत्याचा सर्वात आवडता खाद्यपदार्थ समोसाच आहे आणि त्याने 14 वर्षांपासून समोसा खाल्ला नाहीये. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून गुरमीत चाैधरी आहे. गुरमीत चाैधरी याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.
रामायण मालिकेतून गुरमीत चाैधरी याला खरी ओळख मिळाली. गुरमीत चाैधरी हा कायमच आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. तब्बल 14 वर्षांपासून गुरमीत चाैधरी हा अजिबातच समोसा खात नाही. याबाबतचा खुलासा स्वत: गुरमीत चाैधरी यानेच केला आहे. एक खास पोस्ट गुरमीत चाैधरी याने सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमधून तो खुलासा करताना दिसतोय.
गुरमीत चाैधरी याने शर्टलेस फोटो शेअर केलाय. गुरमीत चाैधरी म्हणाला की, मी 14 वर्षांपासून एकही समोसा खाल्ला नाहीये. मला समोसा खूप जास्त खायला आवडतो. बॉडी तयार करण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. दररोज शूटिंग सुरू असते. परंतू काहीही झाले तरीही मी कधीच वर्कआऊट करणे सोडत नाही.
हेच नाही तर गुरमीत चाैधरीने पोस्टमध्ये लिहिले की, तो डाएट देखील कधीच मिस करत नाही. गुरमीत चाैधरी याची ही पोस्ट पाहून अनेकांना थेट विराट कोहली याचीच आठवण आलीये. विराट कोहली याने देखील 2015 पासून छोले भटूरे एकदाही खाल्ले नाहीत. विराट कोहली याचा देखील सर्वात आवडता पदार्थ छोले भटूरे असून त्याने फिटनेससाठी खाणे बंद केले.
आता गुरमीत चाैधरी याची पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. गुरमीत चाैधरी हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. गुरमीत चाैधरी हा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. गुरमीत चाैधरीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. गुरमीत चाैधरी नेहमीच चर्चेत असतो.