सात दिवसांपासून ‘सोढी’ बेपत्ता, कुटुंबियांनी केला अत्यंत मोठा खुलासा, गुरुचरण सिंगचे लग्न..
अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यापासून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गुरुचरण सिंग याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गुरुचरण सिंगने तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारली आहे. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून मोठी खळबळ बघायला मिळते.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेता बेपत्ता झाल्यापासून मोठी खळबळ ही बघायला मिळत आहे. गुरुचरण सिंगचे कुटुंबिय देखील तणावात आहेत. यासोबतच चाहते हे गुरुचरण सिंग याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. गुरुचरण सिंग ला बेपत्ता होऊन आता सात दिवस झालेत. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत, मात्र पोलिसांच्या हाती अजूनही काही लागले नसल्याचे सांगितले जातंय. गुरुचरण सिंग 22 एप्रिलला दिल्लीच्या घरातून मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडला होता.
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, गुरुचरण सिंगला पैशांची समस्या होती आणि तो आर्थिक तंगीत होता. हेच नाही तर अवघ्या काही दिवसांवरच गुरुचरण सिंगचे लग्न होते आणि तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचेही सांगितले गेले. आता यावरच खुलासा करण्यात आलाय.
गुरुचरण सिंगच्या नातेवाईकांनी म्हटले की, गुरुचरण सिंगच्या लग्नाबद्दल कुटुंबियांना काहीच माहिती नाहीये. मात्र, अभिनेता खरोखरच आर्थिक तंगीत होता का? यावर काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. गुरुचरण सिंग याने 2020 मध्येच तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. त्यानंतर तो कामाचा शोधात असल्याचेही सांगितले जाते.
गुरुचरण सिंगने वडिलांच्या तब्येतीचे कारण देत मालिका सोडली होती. तारक मेहता मालिकेला सुरूवातीपासूनच गुरुचरण सिंग हा जोडला गेला होता. हेच नाही तर गुरुचरण सिंग ऐवजी सोढी याच नावाने लोक त्याला ओळखतात. गुरुचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तो सोशल मीडियावरही सक्रिय होता.
गुरुचरण सिंग हा दिलीप जोशीच्या मुलाच्या लग्नाला डिसेंबरमध्ये पोहचला होता. त्यावेळी तारक मेहताच्या मालिकेच्या टीमसोबत धमाल करताना गुरुचरण सिंग हा दिसला होता. गुरुचरण सिंग हा काही दिवसांपूर्वीच रूग्णालयात दाखल होता. त्याला आरोग्याच्या काही समस्या असल्याचे देखील सांगितले जातंय. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून लोकांमध्ये मोठी खळबळ ही बघायला मिळत आहे.