Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atique Ahmed | ‘मुलाला मारून आता त्याच्या कुटुंबाची मस्करी का?’, अतिक अहमदच्या हत्येप्रकरणी अभिनेत्याचा सवाल

कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मीडियामध्ये सतत त्याच्या कुटुंबीयांची कहाणी दाखवली जात असून त्यावर आता एका अभिनेत्याने आक्षेप नोंदवला आहे. थोडीतरी मर्यादा बाळगा, असं त्याने म्हटलंय.

Atique Ahmed | 'मुलाला मारून आता त्याच्या कुटुंबाची मस्करी का?', अतिक अहमदच्या हत्येप्रकरणी अभिनेत्याचा सवाल
Atique Ahmed
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 10:40 PM

मुंबई : उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये 15 एप्रिल रोजी कुख्यात गुंड आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली. त्याच्या दोन दिवस आधी अतिकचा मुलगा असदचा एन्काऊंटर करण्यात आला होता. अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्येच्या तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे. या हत्येनंतर माध्यमांमध्ये सतत त्याच्या कुटुंबीयांची कहाणी दाखवली जात आहे. त्यावर आता एका बॉलिवूड अभिनेत्याने आक्षेप घेतला आहे. ‘अतिकच्या कुटुंबीयांची मस्करी का करताय? ही चांगली गोष्ट आहे का? थोडीतरी मर्यादा बाळगा’, असं त्याने ट्विटरवर म्हटलंय.

अतिकच्या कुटुंबीयांच्या बाजूने ट्विट करणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘चला अतिक अहमदला मारलं, त्याच्या भावाला मारलं, त्याच्या मुलाचाही जीव घेतला. आता त्याच्या कुटुंबीयांची न्यूज चॅनल्सवर खिल्ली का उडवली जातेय? ही चांगली गोष्ट आहे का? वाईट वेळ ही कधीही कोणावरही येऊ शकते. मात्र थोडी मर्यादा बाळगा. कोणाच्याही मृत्यूवर पैसे कमावू नका.’ अतिकच्या हत्येप्रकरणी त्याने याआधीही काही ट्विट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

केआरकेच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘माफिया डॉन हा तुझा नातेवाईक होता का? इतकं का वाईट वाटतंय तुला’, असा सवाल एकाने केला. तर ‘अतिक अहमदने 200 हून अधिक कुटुंब उद्ध्वस्त केले होते. त्याला कसली सहानुभूती दाखवतोय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

केआरकेचं ट्विट

गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे.

अतिकवर विविध प्रकारचे सुमारे 100 गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असाद आणि असादचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झाशी इथलं पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर शनिवारी अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांना उमेल पाल हत्येप्रकरणात पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्यावेळी हल्ला झाला.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.