‘सोढी’ बेपत्ता, या कलाकाराने केले मोठे विधान, म्हणाला, त्याच्या कुटुंबियांना..
तारक मेहता मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता बेपत्ता झाला. यानंतर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ बघायला मिळाली. अभिनेत्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. चाहते देखील गुरूचरण सिंग याच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. आता कलाकारांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये कित्येक वर्षांपासून रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग हा बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ बघायला मिळतंय. हेच नाही तर अभिनेता 22 एप्रिललाच बेपत्ता झाला. गुरूचरण सिंगच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केलीये. गुरूचरण सिंग बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसत आहे. हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून गुरूचरण सिंगला आरोग्याच्या काही समस्या असल्याचे देखील सांगितले जातंय. काही दिवस रूग्णालयात उपचार देखील गुरूचरण सिंगने घेतले. पोलिस गुरूचरण सिंगच्या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत.
हेच नाही तर शेवटी गुरूचरण सिंग हा दिल्लीच्या पालम परिसरात दिसला. ज्याचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्याने दिल्लीच्या एका एटीएमवरून सात हजार रूपये काढल्याचे देखील पोलिस तपासामध्ये उघड झाले. फक्त अभिनेत्याचे चाहतेच नाही तर इतरही कलाकार हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. प्रत्येकजण गुरूचरण सिंगसाठी प्रार्थना करत आहे.
आता नुकताच गुरूचरण सिंगचा मित्र आणि अभिनेता कंवलप्रीतने मोठे विधान केले आहे. कंवलप्रीत म्हणाला की, जेंव्हा मी गुरूचरण सिंग बेपत्ता झाला हे ऐकले त्यावेळी मला मोठा धक्का बसला. खरोखरच हे खूप जास्त आर्श्चयकारण नक्कीच आहे. आता आपण फक्त त्याच्या सेफ्टीसाठी प्रार्थना करू शकतो, तो कुठेही असो फक्त चांगल्या अवस्थेत असावा.
गुरूचरण सिंगचे कुटुंबिय खूप जास्त वाईट काळातून जात आहेत. मी प्रार्थना करतो की, गुरु नानक जी त्याच्या कुटुंबियांना हिंम्मत देवो. गुरूचरण सिंग दिल्लीवरून घरच्यांना मुंबईला जात असल्याचे सांगून निघाला होता. मात्र, गुरूचरण सिंगसोबत कोणताच संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
मुळात म्हणजे गुरूचरण सिंग हा मुंबईमध्ये आलाच नाही. शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरूचरण सिंग हा दिल्लीच्या रस्त्यांनी चालताना दिसतोय. गुरूचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. गुरूचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. पोलिस आता या प्रकरणात तपास करत आहेत.