‘सोढी’ बेपत्ता, तारक मेहताच्या भिडेने केला मोठा खुलासा, म्हणाला, दिल्ली ते मुंबई..
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. तारक मेहता मालिकेची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. मालिकेच्या प्रत्येक कलाकाराची सोशल मीडियावर चांगली फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते.
तारक मेहता का उल्टा चश्मा फेम गुरूचरण सिंग हा बेपत्ता झाल्यापासून मोठी खळबळ बघायला मिळतंय. 22 एप्रिलपासून सोढी बेपत्ता आहे. मुंबईला जाण्यासाठी दिल्लीच्या घरातून गुरूचरण सिंग हा बाहेर पडला. मात्र, तो मुंबईला आलाच नाही. हेच नाही तर दिल्लीच्या पालम भागातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरूचरण सिंग हा दिसत आहे. रस्त्याच्याकडेने तो एकटाच चालताना दिसतोय. पोलिस या प्रकरणातील तपास करताना दिसत आहेत. मात्र, म्हणावा तसा पुरावा पोलिसांच्या अजूनही हाती लागला नाहीये. 2020 मध्ये गुरूचरण सिंगने तारक मेहता मालिकेला रामराम केला.
गुरूचरण सिंग हा बेपत्ता झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. हेच नाही तर चाहते हे त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. आता गुरूचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर तारक मेहता मालिकेत आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मंदार चांदवडकर म्हणाला की, गुरूचरण सिंग हा नेहमीच दिल्ली ते मुंबई प्रवास करत, त्याच्यासाठी हे काही नवीन नव्हतेच. आमची शेवटची भेट ही दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात डिसेंबरमध्ये झाली. त्यावेळी आम्ही खूप चांगला वेळ एकत्र घालवला. गुरूचरण सिंगचे असे बेपत्ता होणे माझ्यासाठी खरोखरच हैराण करणारे नक्कीच आहे.
डिसेंबरनंतर मी आणि गुरूचरण सिंग संपर्कात नव्हतो. आता हीच प्रार्थना करतो की, सर्व काही ठिक असावे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील अनेक कलाकारांनी गुरूचरण सिंगच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, अनेकांनी गुरूचरण सिंग हा सुखरूप वापस येईल, असे देखील म्हटले आहे.
गुरूचरण सिंग याने मोठा काळ तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत गाजवला आहे. गुरूचरण सिंग याने वडिलांची तब्येत खराब असल्याचे सांगून तारक मेहता मालिका 2020 ला सोडली. त्यानंतर गुरूचरण सिंग हा कोणत्याही इतर मालिकेत दिसला नाही. गुरूचरण सिंग याच्या आरोग्याच्या काही समस्या असल्याचे देखील सांगितले जाते. तो काही दिवसांपूर्वीच रूग्णालयात उपचार घेत होता.