सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल मुकेश खन्ना यांचे मोठे भाष्य, म्हणाले, हिंदू मुस्लिम…

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न 23 जून 2024 रोजी झाले. विशेष म्हणजे लग्नानंतर खास पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. या पार्टीचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल मुकेश खन्ना यांचे मोठे भाष्य, म्हणाले, हिंदू मुस्लिम...
Sonakshi Sinha and Mukesh Khanna
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 1:39 PM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी बॉलिवूड अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे तब्बल 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, लग्नामध्ये वडिलांचा हात पकडून सही करताना सोनाक्षी सिन्हा दिसली. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार देखील पोहोचले होते. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामध्ये आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी मोठे भाष्य केले आहे. मुकेश खन्ना म्हणाले की, प्रेमामध्ये कोणताही धर्म नसतो. या गोष्टीला हिंदू मुस्लिम अॅंगल देऊ नका. सोनाक्षीने जे केले त्यामध्ये तिने अचानकपणे त्याच्यासोबत लग्न केले नाहीये.

सोनाक्षीने 7 ते 8 वर्षांच्या रिलेशननंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग यामध्ये हिंदू मुस्लिम काहीच राहत नाही. जिहाद अशावेळी होते, ज्यावेळी एका छोट्या मुलीला फूस लावून एका वर्षाच्या आतमध्ये लग्न केले जाते. त्यावेळी गडबड होते. ही गोष्ट पूर्णपणे वेगळी असल्याचे देखील मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे.

मुळात म्हणजे इथे दोघेपण कलाकार आहेत. इथे हिंदू मुस्लिम होत नाही. आमच्या काळात देखील लोकांनी अशी लग्न केली आहेत आणि विशेष म्हणजे ते आजही आनंदी आहेत. मुकेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे खूप जास्त जवळचे मित्र आहेत. पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल बोलताना आता मुकेश खन्ना हे दिसले आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा कायमच दिसते. मोठ्या संपत्तीची मालकीन देखील सोनाक्षी सिन्हा ही आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.