Nana Patekar : मोठ्या मुलाच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडले होते नाना पाटेकर, फार कमी होतं लेकाचं आयुष्य

Nana Patekar : मोठ्या मुलाला गमावल्यानंतर नाना पाटेकर यांची झाली होती वाईट अवस्था... फार कमी दिवसांचं होतं नाना पाटेकर यांच्या मोठ्या मुलाचं आयुष्य... सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या मुलाची चर्चा, नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते असतात उत्सुक

Nana Patekar : मोठ्या मुलाच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडले होते नाना पाटेकर, फार कमी होतं लेकाचं आयुष्य
2020 मध्ये देखील नाना पाटेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. नाना पाटेकर यांनी भारत सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध केला होता. म्हणून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती.
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 11:07 AM

मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ होता, जेव्हा नाना पाटेकर यांनी मोठ्या पडद्यावर राज्य केलं होतं. आजही नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांना पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. नाना पाटेकर यांचे जुने सिनेमे आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात. नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज नाना पाटेकर त्यांच्याआयुष्यात आनंदी आहे. पण अनेक संकटांचा नाना पाटेकर यांनी सामना केला.

नाना पाटेकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगयाचं झालं तर, त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी लग्न केलं. नाना पाटेकर यांचं लग्न अभिनेत्री आणि बँक अधिकारी नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झालं. दोघांना एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर नाना पाटेकर यांच्या वडिलांचं निधन झालं. वयाच्या 28 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी वडिलांना गमावलं. वडिलांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी प्रचंड दुःख झालं होतं.

सांगायचं झालं तर, लग्नाच्या एक वर्षानंतर नाना पाटेकर एका मुलाचे वडील झाले. जन्मतः नाना पाटेकर यांच्या मुलाचे ओठ फाटलेले होते. यासोबत नाना पाटेकर यांच्या मुलाला अनेक प्रकृती संबंधीत अडचणी  देखील  होत्या. मुलाच्या जन्मानंतर  नाना यांचं मुलावर असलेलं प्रेम वाढत होतं.

रिपोर्टनुसार, जन्मतः आजारी असल्यामुळे एक दिवस नाना पाटेकर यांच्या मुलाची प्रकृती खालावली. मुलाची प्रकृती खालावल्यामुळे नाना पाटेकर प्रचंड घाबरले होते.  धक्कादायक गोष्ट म्हजणे फक्त अडीच वर्षांचा असताना नान पाटेकर यांच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या निधनानंतर नाना पाटेकर पूर्ण पणे कोलमडले होते. मोठ्या मुलाच्या निधनानंतर काही वर्षांनी नाना पाटेकर यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला.

नाना पाटेकर यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं आहे. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर लाईमलाईटपासून दूर अत्यंत साधं आयुष्य जगतो. मल्हार याने राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक ऑफ 26\11’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता मल्हार पाटेकर याचं स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.