वर्षा उसगांवकर यांची हात जोडून ‘या’ अभिनेत्याने मागितली माफी, म्हणाला, मला खरोखरच…

वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांनी आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकेने केली. मात्र, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या.

वर्षा उसगांवकर यांची हात जोडून 'या' अभिनेत्याने मागितली माफी, म्हणाला, मला खरोखरच...
Varsha Usgaonkar
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 11:58 AM

बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात जोरदार हंगामा होताना दिसतोय. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. रितेश देशमुख या सीजनला होस्ट करतोय. रितेशचा धमाकेदार अंदाज प्रेक्षकांच्या मनात छाप सोडताना दिसतोय. वर्षा उसगांवकर यांच्यासारखे दिग्गज कलकार या सीजनबद्दल जबरदस्त असा गेम खेळताना दिसत आहेत. टीआरपीमध्येही सीजन मस्त कामगिरी करत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीसाठी टास्क झाला. यावेळी घरातील नेहमीप्रमाणे दोन ग्रुप घरात बघायला मिळाले. बिग बॉसच्या घराचा नवीन कॅप्टन आता सूरज चव्हाण हा झालाय.

कॅप्टनसी टास्क अत्यंत खास होता. पॅडी कांबळे यांनी या टास्कमधून वर्षा उसगांवकर यांना बाहेर काढले. वर्षा उसगांवकर यांना आपण कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर काढत असल्याचे पॅडी कांबळेने सांगितल्यानंतर अगोदर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, यावेळी वर्षा उसगांवकर  यांनी स्पष्ट केले की, मला हीच अपेक्षा होती.

पुढे वर्षा उसगांवकर यांना कॅप्टनसीच्या स्पर्धेतून आपण बाहेर का काढत आहोत? याचेही कारण देताना पॅडी कांबळे हे दिसले आहेत. पॅडी कांबळेने म्हटले की, मी वर्षा ताई यांना कॅप्टनसीमधून बाहेर काढत आहे, याचे मला खूप जास्त दु:ख होत आहे. ताई मी तुमची हात जोडून माफी मागतो असेही पॅडी कांबळे यांनी म्हटले.

मुळात म्हणजे वर्षा उसगांवकर यांना पॅडी कांबळे यांनी घेतलेला हा निर्णय अजिबातच आवडला नाही. अंकिता हिला देखील कॅप्टनसीच्या स्पर्धेतून आर्या हिने बाहेर काढले. दुसरीकडे निकी तांबोळी हिने जान्हवीला या स्पर्धेतून बाहेर काढले. कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अरबाज पटेल याला भांडताना जान्हवी किल्लेकर दिसली.

सूरज चव्हाण हा पहिल्यांदाच आता बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झालाय. विशेष म्हणजे तो धमाकेदार असा गेम खेळताना देखील दिसतोय. आता बिग बॉस मराठीचे घर सूरज चव्हाण हा कसे चालवतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. दुसरीकडे आर्या आणि निकी तांबोळी यांच्यात घरात जोरदार वाद होताना दिसतोय. भांड्यावरून यांच्यात वाद सुरू झालाय.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.