Prabhas याचं फेसबूक पेज झालंय हॅक; पोस्ट शेअर करत त्याने दिली महत्त्वाची माहिती
फेसबूक पेज हॅक झाल्यानंतर प्रभास याने दिली महत्त्वाची माहिती...अभिनेता 'तो' फोटो पोस्ट करत म्हणाला..., सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा
मुंबई | 28 जुलै 2023 : दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रभास याचं फेसबूक पेज हॅक झालं आहे. ज्यामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. फेसबूक पेज हॅक झाल्यानंतर प्रभास याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे. गुरुवारी प्रभास यांचं फेसबूक पेज हॅक झालं आहे. हॅकर्सने अभिनेत्याच्या फेसबूक पेजवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहे. “अनलकी ह्यूमन” आणि “बॉल फेल्स अराउन्ड द वर्ल्ड” असे कॅप्शन देवून अभिनेत्याच्या फेसबूक पेजवरुन हॅकर्सने दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर, प्रभास याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत फेसबूक हॅक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
प्रभास पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘माझ्या फेसबूक पेजसोबत ‘कॉम्प्रोमाइज्ड’ करण्यात आलं आहे.. टीम यावर काम करत आहे…’ सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. हॅकिंगची माहिती मिळताच प्रभासच्या टीमने कारवाई केली असून, अधिकृत पेज परत मिळवण्यासाठी कारवाई केली.
Hello Everyone,
My Facebook Page Has Been Hacked. The Team is Sorting this Out.
~ #Prabhas Via Instagram pic.twitter.com/8n1yeABIDT
— Hail Prabhas (@HailPrabhas007) July 27, 2023
प्रभासच्या फेसबूकवर वेगळ्या पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील आक्षेप घेतला. आता प्रभासची टीम यावर काम करत असल्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्रभास याच्या एफबी पेजवर २४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर प्रभास फक्त आणि फक्त एसएस राजामौली यांनी फॉलो करतो..
प्रभास याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, प्रभास याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘बाहुबली’ सिनेमामुळे तर प्रभास याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. पण प्रभास स्टारर ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ मात्र बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. आता पुन्हा प्रभास याच्या नव्या सिनेमांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
प्रभास आता दोन नव्या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. प्रभास अॅक्शन-थ्रिलर सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रशांत नील यांनी यापूर्वी यश स्टारर ब्लॉकबस्टर ‘केजीएफ’चं देखील दिग्दर्शन केलं आहे.
प्रभास स्टारर ‘सालार’ सिनेमा देखील ‘केजीएफ युनिव्हर्स’चा एक भाग असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. सिनेमात प्रभास याच्यासोबत श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा २८ रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.