पुष्कर जोग आणि बीएमसी कर्मचाऱ्यांमधील वाद! वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेता दिलगिरी व्यक्त करत म्हणाला…

pushkar jog : बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पुष्कर जोग याने मागितली माफी, दिलगिरी व्यक्त करत म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पुष्कर जोग याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

पुष्कर जोग आणि बीएमसी कर्मचाऱ्यांमधील वाद! वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेता दिलगिरी व्यक्त करत म्हणाला...
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 8:23 AM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : राज्यात अनेक ठिकाणी मराठा जातीय सर्वेक्षण करण्याचं काम सुरु आहे. त्यांमुळे महानगरपालिकेचे कर्मचारी या सर्वेक्षणासाठी घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती गोळा करत आहेत. दरम्यान, बीएमसीचे कर्मचारी मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग याच्या घरी पोहोचले होते. बीएमसी कर्मचाऱ्यांनी जात विचारल्यानंतर पुष्कर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला… एवढंच नाही तर, अभिनेता पुष्कर जोग पोस्टवर बीएमसीने विरोध करत अभिनेत्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण आता अभिनेत्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.

बीएमसी कर्मचाऱ्यांविरोधात पुष्कर जोग याची पोस्ट

बीएमसी कर्मचाऱ्यांवरल संताप व्यक्त करत अभिनेता म्हणाला, ‘काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते…ते जर बाई माणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार”’अशी पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर केली. यावर अभिनेत्याने आता दिलगिरी व्यक्त केली आहे.

दिलगिरी व्यक्त करत अभिनेता म्हणाला, ‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो… अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पुष्कर जोग याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगील आहे..

पुष्कर जोग याने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पुष्कर याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता लवकरच ‘मुसाफिरा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 2 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात पुष्कर याच्यासोबत पुष्कराज, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.