Video: ‘मी ह्या खाली मास्कचं काय करु?’ दिग्गज अभिनेता ऑक्सिजनशिवाय तडफडला, मरणापूर्वीचा शेवटचा Video समोर

प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा (Rahul Vohra) याचं कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झालं (Actor Rahul Vohra wife Jyoti Tiwari share video and demand justice for husband)

Video: 'मी ह्या खाली मास्कचं काय करु?' दिग्गज अभिनेता ऑक्सिजनशिवाय तडफडला, मरणापूर्वीचा शेवटचा Video समोर
रुग्णालयाचा निष्काळजीपणा, दिग्गज अभिनेता हरपला, निधनानंतर राहुलचा हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 7:19 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा (Rahul Vohra) याचं कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झालं. राहुलने मृत्यूआधी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टनंतर अवघ्या काही तासांनी त्याचं निधन झालं. संबंधित पोस्ट वाचून संपूर्ण देश हळहळला. या पोस्टनंतर आता राहुलचा रुग्णालयात दाखल असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत राहुलने रुग्णालयाकडून किती निष्काळजीपणे काळजी घेतली जात असल्याचं दाखवलं होतं. हा व्हिडीओ त्याच्या निधनानंतर समोर आला आहे. राहुलची पत्नी ज्योती तिवारी (Jyoti Tiwari) हीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिने आपल्या पतीला न्याय मिळावा, अशी मागणी केली (Actor Rahul Vohra wife Jyoti Tiwari share video and demand justice for husband).

नेमकं व्हिडीओत काय?

व्हिडीओत राहुल रुग्णालयात दाखल असल्याचं दिसत आहे. तो स्वत: मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडीओ शूट करत आपली व्यथा मांडताना दिसतोय. रुग्णालयाचे डॉक्टर त्याच्या चेहऱ्यावर फक्त ऑक्सिजनचं मास्क लावून निघून गेले होते. मात्र, त्यातून ऑक्सिजन येत नव्हता. त्याने नर्सला याबाबत तक्रारीही केल्याचं त्याने सांगितलं. पण रुग्णालयातील कुणीही याकडे लक्ष देत नसल्याचं राहुल व्हिडीओत म्हणाला (Actor Rahul Vohra wife Jyoti Tiwari share video and demand justice for husband).

View this post on Instagram

A post shared by Jyoti Tiwari (@ijyotitiwari)

राहुल नेमकं काय म्हणाला?

ऑक्सिजन मास्क हातात घेऊन राहुल म्हणाला, आजच्या काळात हे खूप महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय माणूस आज जगू शकत नाही. यानंतर राहुल चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावतो. त्यानंतर तो ते मास्क काढतो. यामधून काहीच येत नाहीय, असं तो म्हणतो.

“अटेंडेट आली होती. ती म्हणाली की, एक बाटली असते. त्यामध्ये पाणी येत-जात असतं. एवढं बोलून ती निघून जाते. त्यानंतर त्यांना पुन्हा आवाज द्यावा लागतो. त्यांना अनेकदा आवाज दिल्यानंतरही ते येत नाहीत. ते एक-दीड तासांनी येतात. तोपर्यंत मॅनेज करा. कुणाला सांगितलं तर ते सांगतात एक मिनिटात येत आहे. मी या खाली मास्कचं काय करु?”, असा प्रश्न राहुल उपस्थित करतो.

राहुल आणि ज्योती यांचा एकत्र फोटो

पत्नीकडून न्यायाची मागणी

राहुलच्या पत्नी ज्योतीने सोशल मीडियावर संबंधित व्हिडीओ शेअर करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. “प्रत्येक राहुलला न्याय मिळायला हवा. माझा राहुल गेला हे सगळ्यांना माहिती आहे. पण तो कसा गेला ते सगळ्यांना माहिती नाही. दिल्लीच्या राजीव गांधी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारे उपचार केला जातो. मी आशा करते की, माझ्या पतीला न्याय मिळेल. आता आणखी कोणता राहुल या दुनियेतून जायला नको”, असं ज्योती तिवारी म्हणाली.

राहुल व्होरा याच्याविषयी माहिती

35 वर्षीय राहुल व्होरा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंजत होता. तो सातत्याने फेसबुकवरुन मदत मागत होता. मात्र वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचं निधन झाल्याचं बोललं जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.