तारक मेहता मालिका सोडल्यानंतर टप्पूने दिली खुशखबर, अखेर राज अनाडकत याने…
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या मालिकेचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. जवळपास सर्वांनाच ही मालिका प्रचंड आवडते. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार या मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तारक मेहता मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. तारक मेहता मालिका जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना आवडते. तारक मेहता मालिकेतील सर्वांचा आवडता विषय म्हणजे टप्पू सेना आहे. टप्पू सेनाचा प्रमुख टप्पूच आहे, जो दयाबेन आणि जेठालालचा मुलगा आहे. मालिकेत अनेक वर्षे राज अनाडकत याने टप्पूची भूमिका साकारली आहे.
राज अनाडकत याला लोक टप्पू याच नावाने ओळखतात. राज अनाडकत याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. राज अनाडकत सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. व्लॉगच्या माध्यमातून राज अनाडकत हा आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असतो. आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय.
राज अनाडकत याने काही दिवसांपूर्वीच तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. चाहते सतत राज अनाडकत याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास इच्छुक दिसले. आता शेवटी राज अनाडकत हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याबद्दल स्वत: राज अनाडकत याने खुलासा केलाय.
राज अनाडकत हा एका मालिकेतून पुनरागमन करण्यास तयार आहे. राज अनाडकत हा एका गुजराती मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहे. GEC चॅनलवरील मालिकेत राज अनाडकत मुख्य भूमिकेत असणार आहे. याबाबत त्याने खुलासा केलाय. राज अनाडकत याने आपल्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच चाहत्यांना प्रेम आणि त्याच्यासाठी प्रार्थना मागितली आहे.
या मालिकेत राज अनाडकत याच्यासोबत अभिनेत्री सना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजने त्याच्या व्लॉगमध्ये म्हटले की, या नव्या प्रवासासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे. मी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. मला माहित आहे की, तुम्ही सर्व मला पुन्हा टीव्हीवर पाहण्याची वाट पाहत आहात, मी खूप उत्साही आणि थोडा तणावात आहे.