Rajinikanth Health Update | सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यांना चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्यविषयक तपासणी (health check up) करण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Rajinikanth Health Update | सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल
rajinikanth
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 10:46 PM

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यांना चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्यविषयक तपासणी (health check up) करण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात हलवलं

सुपरस्टार रजनीकांत यांना 25 ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. संपू्र्ण भारतभर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र सध्या त्यांना चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना तडकाफडकी रुग्णालयात भरती का केलं गेलं, याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मागील वर्षी 25 डिसेंबर रोजी प्रकृती बिघडली

सुपरस्टार रजनीकांत यांचे संपूर्ण भारतात चाहते आहेत. त्यांनी अभिनय केलेला चित्रपट हा सुपरहीट ठरतो. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून रजनीकांत अनेक कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत. तामिळनाडू राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील वर्षी 31 डिसेंबरला मी नव्या पक्षाची घोषणा करेल असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्याआधी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांनी कोणताही पक्ष स्थापन करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

25 डिसेंबरला रुग्णालयात दाखल 27 डिसेंबरला डिस्चार्ज

रजनीकांत ‘अन्नाथे’ (Annaatthe) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होते. यावेळी 25 डिसेंबर 2020 रोजी अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना 27 डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत होता.

इतर बातम्या :

Aryan Khan Granted Bail | मुलाला जामीन मिळताच शाहरुख खानने घेतली वकिलांची भेट

Actress Samantha Ruth Prabhu : सामंथाने शेअर केले दुबई ट्रिपचे सुंदर फोटो, सोशल मीडियावर धुमाकूळ

प्रभास-अनुष्का ते तब्बू-नागार्जुन, ‘या’ कलाकारांच्या अफेअर्सच्या चर्चांनी चाहते देखील झाले अवाक्!

(Actor Rajinikanth admitted to Kauvery Hospital in Chennai for health check up )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.