रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कोण आहे जास्त श्रीमंत? महागड्या गाड्यांचे कलेक्शन, इतक्या कोटींचे…

Ranbir Kapoor and Alia Bhatt : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेली जोडी आहे. विशेष म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. विशेष म्हणजे दोघेही अत्यंत मोठ्या संपत्तीचे मालक आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कोण आहे जास्त श्रीमंत? महागड्या गाड्यांचे कलेक्शन, इतक्या कोटींचे...
Ranbir Kapoor and Alia Bhatt
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 5:22 PM

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल 2023 रोजी लग्न केले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. हेच नाहीतर लग्नाच्या काही दिवसांमध्ये आलिया भट्ट हिने राहा हिला जन्म दिला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचेही अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. रणबीर कपूर याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आलिया भट्ट हिचे देखील एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही आलिया भट्ट ही चांगलीच सक्रिय दिसते.

विशेष म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघेही अत्यंत मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. रणबीर कपूर याच्याकडे आलिया भट्ट हिच्यापेक्षाही अधिक संपत्ती आहे. रणबीर कपूर याच्याकडे 345 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये रणबीर कपूर याच्याकडे अत्यंत महागड्या गाड्या आहेत. एका चित्रपटासाठी 50 कोटीपर्यंत फीस रणबीर कपूर हा घेतो.

रणबीर कपूर याच्याकडे Rolls Royce, Mercedes Benz GL, Range Rover, Audi RS7 अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. यासोबतच रणबीर कपूर याच्याकडे बांद्रामध्ये 4 BHK फ्लॅट देखील आहे, ज्याची किंमत तब्बल 35 कोटी आहे. रणबीर कपूरच्या एकूण संपत्तीमध्ये दरवर्षी 40 टक्क्यांनी वाढत होत आहे. 

दुसरीकडे आलिया भट्ट हिची 299 कोटी संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी आलिया भट्ट ही 20 लाख रूपये फीस घेते. हेच नाहीतर आलिया भट्ट ही चित्रपटाचे प्रोडेक्शन देखील चालवते. यामधून ती मोठी कमाई देखील करते. आलिया भट्टचे मुंबईमध्ये 32 कोटींचे घर आहे. लंडनमध्येही आलियाचे 25 कोटींचे घर आहे.

आलियाकडे महागड्या गाड्यांचेही मोठे कलेक्शन आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे मोठी कमाई करतात. आलिया भट्ट हिचे चित्रपट काही दिवसांपासून चांगलाच धमाका करताना देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, आलिया भट्ट, नीतू कपूर आणि राहा हे एकत्र स्पॉट झाले होते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.