Fraud | रितेश देशमुख इन्स्टाग्रामच्या सायबर फ्रॉडचा शिकार होताना थोडक्यात वाचला, फॅन्ससाठी हा महत्त्वाचा संदेश

| Updated on: Jan 09, 2021 | 12:12 PM

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) सायबर फसवणूक होत असल्याचा एक संदेश लोकांना दिला आहे.

Fraud | रितेश देशमुख इन्स्टाग्रामच्या सायबर फ्रॉडचा शिकार होताना थोडक्यात वाचला, फॅन्ससाठी हा महत्त्वाचा संदेश
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) इन्स्टाग्रामवर सायबर फसवणूक होत असल्याचा एक संदेश लोकांना दिला आहे. ज्यामध्ये रितेशने माहिती दिली आहे की, कशाप्रकारे तुम्हाला त्यामध्ये अडकवले जाते. या बाबत रितेशने एक ट्विट केले आहे आणि काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडून याबाबत माहिती सांगण्यात येत आहे. यामध्ये इन्स्टाग्रामवर एक संदेश येतो तुम्ही शेअर केलेली पोस्ट कॉपीराइट उल्लंघन दाखवते आहे, हे चुकीचे आहे. (Actor Riteish Deshmukh’s message regarding Instagram’s cyber fraud)

त्याबद्दल आपला अभिप्राय द्या, अन्यथा तुमचे खाते 24 तासांच्या आत बंद होईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आपण आपला अभिप्राय देऊ शकता. असा संदेश पाठवला जात आहे आणि जर ही लिंक आपण क्लिक केली तर आपली सर्व माहिती चोरली जाते आणि आपले अकाऊंट हॅक केले जाते. या सर्व प्रकाराचा अनुभव रितेश देशमुखला आला आहे. आणि तो सर्वांना अशा प्रकारच्या संदेश आणि लिंकपासून सतर्क राहिले पाहिजे असे सांगत आहे. पुढे रितेश म्हणतोकी, मला देखील अशाप्रकारचा संदेश आणि लिंक थेट आली होती. पण सुदैवाने मी दिलेल्या लिंकवर क्लिक केले नाही.

अलीकडेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटी सायबर फसवणूकीचे शिकार होत आहेत. ज्यामध्ये त्यांचे इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्सना हॅक केले जात आहे. चित्रपट निर्माते आनंद एल. राय, अभिनेता विक्रांत मैसी आणि उर्मिला मातोंडकर, कोरियोग्राफर फराह खान आणि गायक आशा भोंसले,अंकित तिवारी याचे सोशल मिडियाचे अकाऊंट हॅक झाले आहेत.

मध्यंतरी रितेश सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. रितेशने पत्नी जेनेलिया डिसूजाला सरप्राईज करण्यासाठी नवी हेअरस्टाईल केली होती. मात्र, सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने रितेशलाच सरप्राईज मिळाल्याची चर्चा रंगली होती.

संबंधित बातम्या : 

जाह्नवी कपूर आणि कार्तिक आर्यनचं ‘खास नातं?’, अफेयर्सच्या चर्चांना उधाण!

बॉलिवूडच्या निशाण्यावर चंद्रमुखी देवी; उर्मिला, तापसी आणि पूजा भट्टकडून समाचार!

(Actor Riteish Deshmukh’s message regarding Instagram’s cyber fraud)